Rahul Dravid told what was in thatparcel of Virat Kohli
Rahul Dravid told what was in thatparcel of Virat Kohli  saam tv
क्रीडा | IPL

Virat Kohli: विराटसाठी मैदानात आलेल्या त्या पार्सलमध्ये नेमकं काय होतं? द्रविडने टाकलं सांगून...

Chandrakant Jagtap

Rahul Dravid on Virat Kohli Parcel: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. या मालिकेत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला गेलेला मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 गडी राखून जिंकला आहे.

दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओत एक व्यक्ती विराटसाठी पार्सल घेऊन येताना दिसत आहे. ते पाहून विराटची रिअॅक्शन देखील अप्रतिम होती. त्यामुळे या व्हिडिओची खूप चर्चा झाली. (Latest Sports News)

विराटसाठी आलेल्या त्या पार्सलमध्ये नेमकं काय होतं असा प्रश्न सोशल मीडियावर यूजर्स विचारत होते, तर काहींनी त्यात छोले भटुरे होते असा दावा केला आहे. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्या पार्सलमध्ये नेमकं काय होतं हे गुपित उघड केले आहे.

राहुल द्रविड यांनी हसत हसत सांगितले की 'ते चोले भटुरे नव्हते, कुलचा छोले होते. तो मला देखील त्याच्या मोहात पाडत होता, पण मी म्हणालो की मी 50 वर्षांचा आहे, मी आता इतके कोलेस्ट्रॉल सहन करू शकत नाही'. (Sports News)

रवींद्र जडेजा ठरला सामनावीर

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवशीच ६ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांत आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या.

यानंतर रविंद्र जडेजा आणि आर आश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात टीम इंडियाने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात त्याने एकूण 10 बळी घेतले आणि 26 धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

SCROLL FOR NEXT