nitish kumar reddy twitter
Sports

Nitish Kumar Reddy: रेड्डीचा नाद करायचा नाय! बोलँडला अल्टी पल्टी फिरुन मारला षटकार; पाहा VIDEO

Nitish Kumar Reddy, IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत नितीश रेड्डीने शानदार षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलिया संघासाठी आऊट ऑफ सिलॅबस ठरतोय. आधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड आणि पहिल्याच कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी. पहिल्या सामन्यातही त्याने नाबाद राहुन शानदार खेळी केली होती.

आता दुसऱ्या सामन्यातही त्याच्या शानदार फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. यादरम्यान त्याने स्कॉट बोलँडच्या षटकात खणखणीत षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नितीश राणाचा शानदार षटकार

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. एकीकडे विकेट्स जात होते, तर दुसऱ्या बाजूने नितीश कुमार रेड्डीने एक बाजू धरुन ठेवली होती. त्याने स्कॉट बोलँडला शानदार षटकार मारला.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना ४२ वे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर नितीशने शानदार शॉट मारला. बोलँडने वेगवान चेंडू टाकला. या लेंथ बॉलवर नितीशने रिव्हर्स स्कूप शॉट मारला. हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला.

नितीश रेड्डी एकटा लढला

या डावात फलंदाजी करताना कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. नितीशने केलेली ४२ धावांची खेळी ही सर्वात मोठी खेळी ठरली. तर केएल राहुलने ३७ धावांची खेळी केली. शुभमन गिल ३१ धावा करत माघारी परतला. रिषभ पंतने २१ धावा केल्या. तर शेवटी आर अश्विनने २२ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव १८० धावांवर आटोपला.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

भारत- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT