ind vs aus 2nd odi team india probable playing 11 no change in team india 2 changes in australia team  Twitter
Sports

IND vs AUS, Playing 11: दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात होणार मोठे बदल? पाहा कशी असेल प्लेइंग ११

India vs Australia 2nd ODI Playing 11: पाहा कशी असेल या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग ११.

Ankush Dhavre

India vs Australia 2nd ODI Playing 11:

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना रंगणार आहे. पहिला वनडे सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दुसरीकडे पहिला सामना जिंकून आलेला भारतीय संघ, हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११.

मोहाली वनडेत एकट्या शार्दुल ठाकूरला वगळलं तर उर्वरित सर्व खेळाडूंनी दमदार खेळ केला. गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. तर फलंदाजीत शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने बहुमूल्य योगदान दिलं. ही कामगिरी पाहता, भारतीय संघ दुसऱ्या वनडेतही या प्लेइंग ११ सह मैदानात उतरू शकतो. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाच्या संघात होणार बदल?

पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. मात्र गोलंदाजीत त्यांना योगदान देता आल नाही.

पहिल्या वनडेसाठी प्लेइंग ११ मध्ये केवळ १ मुख्य वेगवान गोलंदाज आणि १ मुख्य फिरकीपटूचा समावेश करण्यात आला होता. तर उर्वरित अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे दुसरी वनडे जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळू शकतात.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक/कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, जोश ईंग्लिस (यष्टिरक्षक), मार्कस स्टोइनिस, तनवीर सांघा, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवुड आणि ॲडम झांपा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो ? यावर उपाय काय ?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT