Team India Saam Tv
Sports

Ind vs Aus: पहिल्या वनडेत हार्दिक पंड्या 'या' प्लेइंग 11 सह उतरणार मैदानात! विराटच्या खास प्लेअरला ठेवणार संघाबाहेर

चला तर पाहूया या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

Ind vs Aus 1st odi playing 11: कसोटी मालिका झाल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत.

या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळू शकते.

चला तर पाहूया या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११. (Latest sports updates)

या सलामीवीर फलंदाजांना मिळणार संधी..

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे ईशान किशन आणि शुभमन गिल यांना डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.

हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे हे दोघेही भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात. आतपर्यंत दोघांनी वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे.

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळणार संधी..

या सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. विराट सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर झाल्याने आता चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते.

अष्टपैलू खेळाडू..

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आणि जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेलला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते.

या गोलंदाजांना मिळणार संधी..

हार्दिक पंड्या स्वतः गोलंदाजी करणार आहे. तर मोहम्मद सिराज,मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरलाही संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे २ फिरकी गोलंदाज असताना युजवेंद्र चहलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक

पहिला सामना- १७ मार्च - शुक्रवार, मुंबई

दुसरा सामना - १९ मार्च- रविवार- विशाखापट्टणम

तिसरा सामना - २२ मार्च, बुधवार, चेन्नई

ऑस्ट्रेलिया संघ -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन एबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा

भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT