India dominated Day 2 of the Test against Afghanistan as debutant Manav Suthar saam tv
Sports

IND vs AFG Test Day 2: मानव सुथारच्या फिरकीत अडकला अफगाणिस्तान; अर्धा संघ तंबूत परतला, फॉलोऑनचं संकट

IND vs AFG Test, DAY-2: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसही भारतीय संघाच्या नावावर राहिला. भारतीय संघाने आपला पहिला डाव ५६४ धावांवर घोषित केला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना अफगाण संघाचे निम्म खेळाडूंना परत माघारीही पाठवलं.

Bharat Jadhav

  • भारताने पहिला डाव ५६४ धावांवर घोषित केला.

  • मानव सुथारने प्रभावी फिरकी गोलंदाजी केली.

  • दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ११३ अशी होती.

मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसरा दिवसही भारतीय संघाच्या नावावर राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय खेळाडूंनी तुफान खेळी करत धुमाकूळ घातला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने गोलंदाजीने अफगाण संघाला चकित केलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात अफगाणिस्तानने ५ गडी गमावून ११३ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान अजूनही ४५१ धावांनी मागे आहे, त्यामुळे संघावर फॉलोऑनचं संकट आले आहे.

टीम इंडियानं बनवल्या ५६४ धावा

भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ३६८ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी ऋषभ पंतनं ८१ धावांची शानदार खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद राहत ५२ धावा केल्या. तर मानव सुथारने २८ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराजनेही १२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या, ज्यामुळे भारताने ८ गडी गमावून ५६४ धावांवर आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद सलीमने सर्वाधिक सहा बळी घेतले. झियाउर रहमान आणि हशमतुल्ला शाहिदी यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.

पंतचे शतक हुकले

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३६८/३ होती. त्यावेळी शुबमन गिल (१०३) शतकावर नाबाद होता आणि ऋषभ पंत (५०) अर्धशतकावर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी गिलची पहिली विकेट पडली. कर्णधार गिलनं ११७ चेंडूंमध्ये १२६ धावा केल्या. ध्रुव जुरेल (१९) स्वस्तात बाद झाला. ऋषभ पंत ८१ धावा झाल्यानं त्याचे शतक हुकले.

सिराजची स्फोटक फलंदाजी

पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने ४१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या, तर मोहम्मद सिराजने १२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर अर्धशतक झळकावून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम साफीने सहा बळी घेतले.

मानव सुथारची शानदार गोलंदाजी

५६४ धावांच्या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दबाव कायम ठेवला. पण सामन्याचे खरे आकर्षण ठरला डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार. त्याने आपल्या पदार्पणात शानदार कामगिरी केली. त्याने मुल्लानपूरच्या खेळपट्टीवरील फिरकीचा पुरेपूर फायदा घेतला.

अफगाण फलंदाजांना स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने ११३ धावांत पाच गडी गमावले होते. मानव सुथारने १५.५ षटकांत केवळ २१ धावा देत तीन बळी घेतले. अब्दुल मलिक हा त्याचा पहिला बळी होता. त्यानंतर मानव सुथारने रहमानुल्ला गुरबाज आणि अफसर झाझाई यांना बाद केले. प्रसिद्ध कृष्णा देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ७ षटकांत २७ धावा देऊन २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT