Rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma: रोहितचं हे चुकलच! पहिल्याच सामन्यात केलेली ही चूक टीम इंडियाला महागात पडली

Rohit Sharma News In Marathi: भारताने हा सामना तर जिंकला. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक मोठी चूक केली जी भारतीय संघाला महागात पडू शकली असती.

Ankush Dhavre

Rohit Sharma Mistake In IND vs AFG 1st Match:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारती संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना तर जिंकला. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक मोठी चूक केली जी भारतीय संघाला महागात पडू शकली असती.

रोहित शर्माने या सामन्यात कुलदीप यादवला बाकावर बसवून ठेवलं. या सामन्यात त्याची कमतरता जाणवली. एक अतिरिक्त फलंदाज म्हणून या संघात वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिलं गेलं होतं. वॉशिंग्टन सुंदरला संघात खेळवायचं म्हणून रोहितने कुलदीप यादवला प्लेइंग ११ मधून बाहेर केलं.

रोहितचा निर्णय चुकला?

या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेली मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलेलं नाही. या सामन्यात त्याने ३ षटकं टाकली, यादरम्यान त्याने २७ धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

त्याला गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. गोलंदाजीत तर तो फ्लॉप ठरला आणि त्याला फलंदाजीला येण्याची संधीच मिळाली नाही. जर त्याच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान दिलं गेलं असतं तर कदाचित तो गोलंदाजीत विकेट्स काढून देऊ शकला असता. (Latest sports updates)

पहिल्याच सामन्यात रोहितचा निर्णय चुकला..

कुलदीप यादव फलंदाजीत हवं तितकं योगदान देऊ शकत नाही. मात्र गोलंदाजीत तो संघाला विकेट्स काढून देऊ शकतो. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती.तर वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर,त्याला गेल्या ६ टी-२० सामन्यांमध्ये केवळ २ गडी बाद करता आले आहेत. तर ५ टी-२० सामन्यांमध्ये तर त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

Tulsi Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या तुळशीचे पाणी, वजन होईल झटक्यात कमी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी संपत आला तरी जानेवारीचा हप्ता नाही, ₹१५०० न येण्यामागचं कारण काय? वाचा

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला

Exercise For Weight Loss: चालणं, जॉगिंग की सायकलिंग? कोणत्या व्यायामाने लवकर वजन होईल कमी?

SCROLL FOR NEXT