India vs australia records  twitter
Sports

India vs Australia Records: विराटने, सचिन अन् पाँटिंगलाही सोडलं मागे! IND vs AUS सामन्यात बनवले गेले हे मोठे रेकॉर्ड्स

World Cup 2023: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठे रेकॉर्ड्स बनवले गेले आहेत .

Ankush Dhavre

Records Made In India vs Australia, World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना रेकॉर्ड ब्रेकिंग ठरला आहे. चेपॉकच्या मैदानावर झालेल्या या लढतीत भारतीय संघाला विजयाचा नारळ फोडण्यासाठी २०० धावा करायच्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना,भारतीय संघाने ५२ चेंडू शिल्लक ठेऊन जोरदार विजय मिळवला. या सामन्यात एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड बनवले आणि मोडले गेले आहेत.

हा सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडला. वर्ल्डकप स्पर्धेत चेन्नईच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.१९८७ नंतर या मैदानावर ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नव्हता. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. पहिल्यांदाच चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाला आहे.

सर्वात कमी धावांवर ३ फलंदाज बाद होऊन सामना जिंकणारे संघ...

२ धावा -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, २०२३*

४ धावा- भारत विरूद्ध झिम्बाब्वे, अॅडिलेड, २००४

४ धावा- श्रीलंका विरूद्ध बांगलादेश, मीरपुर, २००९

५ धावा- श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड,ढाका, १९९८

वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज...

शिखर धवन- ११७ धावा, २०१९

अजय जडेजा- १००* धावा, १९९९

केएल राहुल - ९७* धावा, २०२३

आयसीसी वनडे वर्ल्डकप-टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...

विराट कोहली - २७८५ (६४ डावांत)

सचिन तेंडुलकर- २७१९ (५८ डावांत)

रोहित शर्मा -२४२२ (६४ डावांत)

युवराज सिंग- १७०७ (६२ डावांत)

सौरव गांगुली - १६७१ (३२ डावांत)

वनडेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारे फलंदाज (सलामीवीर फलंदाज वगळता)

विराट कोहली - ११३ वेळेस

कुमार संगकारा- ११२ वेळेस

रिकी पाँटिंग - १०९ वेळेस

जॅक कॅलिस - १०२ वेळेस

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज

१९ डावांत - डेव्हिड वॉर्नर*

२० डावांत - सचिन तेंडुलकर/ एबी डिव्हीलियर्स

२१ डावांत -विव रिचर्ड्स/सौरव गांगुली

२२ डावांत- मार्क वॉ/ हर्शल गिब्स

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्यांदा दोन्ही भारतीय सलामीवीर शून्यावर बाद

विरूद्ध झिम्बाब्वे, १९८३

विरूद्ध ऑस्ट्रेलिया, २०२३

वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

विराट कोहली - ५५१७ धावा

सचिन तेंडुलकर - ५४९०

रिकी पाँटिंग ४१८६

रोहित शर्मा - ३९८३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT