If ind vs nz semi final match is cancelled due to rain Team India will qualify for world cup 2023 final Saam TV
Sports

IND vs NZ Semifinal: टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं, कारण काय?

IND vs NZ Semifinal Match: टीम इंडियाचा पुढील सामना बलाढ्य न्यूझीलंडसंघासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

Satish Daud

IND vs NZ Semifinal Match Latest Updates

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली. साखळी फेरीतील सलग ९ सामने जिंकत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता टीम इंडियाचा पुढील सामना बलाढ्य न्यूझीलंडसंघासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, हा सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे. कारण, सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहेत. म्हणजेच या सामन्यावरही पावसाची काहीशी शक्यता कायम आहे. अशा परिस्थितीत भारत-न्यूझीलंड (IND vs NZ Match) यांच्यातील सेमीफायनल सामन्यात पाऊस झाला तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उपांत्य फेरीतील सामन्यात पावसाने खोडा (Rain Alert) घातला, तर आयसीसीने राखीव दिवसाची व्यवस्था केली आहे. म्हणजेच या सामन्यांदरम्यान पाऊस पडल्यास दुसऱ्या दिवशी खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा परिस्थितीत सामन्यातील षटके कमी केली जाणार नाहीत.

पण जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना खेळवण्यात आला नाही, तर गुणतालिकेतील स्थानाच्या आधारे विजेता घोषित केला जाईल. अशातच टीम इंडियाला (Team India) विजेता घोषित केलं जाईल. कारण गुणतालिकेत भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा खूपच पुढे आहे.

सध्या भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला विजेता घोषित केलं जाईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातही निकाल असाच लागेल. म्हणजेच दुसरा उपांत्य सामना पावसाने वाहून गेला तर दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT