Ind vs Aus
Ind vs Aus  Saam tv
क्रीडा | IPL

ICC WTC Points table: ऑस्ट्रेलियाचं WTC फायनलचं तिकीट कन्फर्म, टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर?वाचा काय आहे समीकरण

Ankush Dhavre

IND VS AUS 3rd test icc wtc final: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ७६ धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने सहजरित्या पूर्ण केले. भारताच्या या पराभवानंतर कसं आहे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याचं समीकरण?चला पाहुया.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकून थेट अंतिम सामान्यचं तिकीट मिळणार होतं. आता हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तर भारतीय संघाचा मार्ग कठीण झाला आहे.

भारतीय संघाने मालिकेतील तिसरा कसोटी सामना गमावला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल. तर कुठल्याही परिस्थितीत चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल. (Latest sports updates)

मात्र चौथ्या कसोटीतही भारतीय संघ पराभूत झाला किंवा सामना बरोबरीत सुटला. तर भारतीय संघाला श्रीलंका विरुध्द न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. श्रीलंकेने २ पैकी कमीत कमी १ सामना गमावला तर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो.

दुसऱ्या कसोटीनंतर काय होते समीकरण?

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतरही ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानी कायम होता. ऑस्ट्रेलियाचे पॉईंट्स ६६.६७ इतके होते. तर दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाचे पॉईंट्स ६४.०६ इतके झाले होते.

या यादीत श्रीलंका संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या आणि इंग्लंड संघ पाचव्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT