Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

Pune Crime News Today: सशस्त्र दरोड्याच्या घटनेने पुण्यात खळबळ, सोन्याच्या दुकानावर 7 जणांनी येऊन मुद्देमाल लुटला, पोलिस तपास सुरु, आरोप अजूनही फरार

पुण्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. दुचाकी वरून आलेल्या सात जणांनी सोन्याचे दुकानावर दरोडा टाकला. शस्त्राचा धाक दाखवत पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकांनावर दरोडा टाकण्यात आला. यात 7 दरोडेखोरांनी मास्क लावून मोहम्मदवाडी रोडवर वारकर मळा येथील बी जी एस ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा टाकला. यात 300 ते 400 ग्राम सोने नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर लाखोंचा मुद्देमाल लुटलाय. दुचाकी वरून आलेल्या आरोपी सोने घेऊन पसार झाले आहेत. वानवडी विभागाचे डीसीपी आर राजा,गुन्हे शाखा डी सी पी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. सीसीटिव्ही पोलिसांच्या हाती त्या आधारे पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com