हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा महिला विश्वचषकावर नाव कोरल
हरमनप्रीतने शेफाली वर्माला गोलंदाजीसाठी आणून सामन्याचा फिरवला
शेफालीने दोन मोठे विकेट घेत दोन षटकांत सामना फिरवला
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत इतिहास घडवला
भारताच्या पोरींनी कित्येक दशकांचा दुष्काळ संपवला. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये हरमनप्रीत आणि संपूर्ण टीमने भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. भारताचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न २०२५ मध्ये पूर्ण झालं. टीम इंडियाने (Women) पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तगड्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजयाची ट्रॉफी हिसकावली आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताच्या हातून ट्रॉफी निसटतेय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने एक जबरदस्त डाव टाकत सामना फिरवला
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९९ धावांचं आव्हान होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना २ गडी गमावून ११४ धावा झाल्या होत्या. लौरा वोल्वार्ट पूर्णपणे क्रिजवर सेट झाली होती. त्यावेळी हरमनप्रीतने डोकं चालवत गोलंदाजीसाठी शेफाली वर्माला संधी दिली. हरमनप्रीतचा हा डाव यशस्वी झाला.
शेफालीने लुसला २५ धावांवर बाद केलं. लुसला बाद करत शेफालीने मोठी भागीदारी तोडली. यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मारिजाने कॅपला देखील अवघ्या ४ धावांवर बाद केलं. शेफालीची या दोन षटकांमधील गोलंदाजी टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरली. तगडे खेळाडू बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पुढे आव्हानाला सामोरे जाणे अवघड झाले.
शेफालीने फलंदाजी करताना कमाल केली. प्रतिका रावल जखमी झाल्यानंतर शेफालीला संघात स्थान मिळालं होतं. या सामन्यात तिने तगड्या खेळाडूंच्या दांड्या गुल केल्या. तिने फलंदाजी करताना ७८ चेंडूत ८७ धावा कुटल्या. या डावात तिने ७ चौकार आणि २ षटकार लगावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.