ICC Women T20 World Cup Team India Saam TV
क्रीडा

Women T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने पाकिस्तानचा मोठा फायदा; टीम इंडियाचं नुकसान, सेमीफायलनचं गणित बिघडलं

Satish Daud

आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंडचा तब्बल 60 धावांनी पराभव केला. या पराभवासह त्यांनी गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंडचा संघ पराभूत झाल्याने पाकिस्तानला दुसरं स्थान कायम ठेवता आलं.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग आणखीच खडतर झाला आहे. दुबई येथे सध्या महिला टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना अ गटात ठेवण्यात आलं आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ ब गटात आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांनाच उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ 2 सामन्यांत 2 विजयांसह अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर असून भारतीय संघ चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव, तर पाकिस्तानविरुद्ध विजय नोंदवला आहे.

टीम इंडियाचे आणखी 2 सामने बाकी असून सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी नेट रनरेट सुधारण्याची गरज आहे. कारण, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाचे नेट रनरेट खूपच खाली गेले आहे. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवायचे असेल, तर भारतीय संघाला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

जेणेकरून त्यांचा निव्वळ धावगती सुधारू शकेल. तसेच इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार नाही. दुसरीकडे न्यूझीलंड आणि पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारतीय संघापेक्षा चांगली संधी आहे.

दरम्यान, भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील होणाऱ्या सामन्यावर होती. या सामन्यात जर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असता, तर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग आणखी सोपा झाला होता. मात्र, तसे झाले नाही. आता भारतीय संघाची नजर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमधील सामन्यावर असणार आहे.

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होणं गरजेचं आहे. जर असं झाल्यास पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत खाली येईल. दुसरीकडे न्यूझीलंड संघाचा आणखी एक पराभव होणं गरजेचं आहे. इतक्यावरच अवलंबून न राहता भारतीय संघाला आपले पुढचे दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ सलग दुसऱ्या विजयासह ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यांचे ४ गुण आहेत. त्याचबरोबर पराभवानंतर न्यूझीलंडची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. किवी संघाचे आता 2 सामन्यांत 2 गुण झाले असून त्यांचा नेटरनरेट मायनसमध्ये आहे. फक्त चांगल्या नेट रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ किवी संघापेक्षा वरचढ आहे. भारताचेही 2 गुण आहेत पण खराब नेट रन रेटमुळे ते टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024 : पुण्यातल्या 'या' मंदिरांत होतो देवीचा जागर

Marathi News Live Updates: सत्यशील शेरकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता

Parbhani News : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

VIDEO : वंचितची दुसरी यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

Amruta Khanvilkar : अमृताचे रूप म्हणजे लावण्यवती चंद्राची चांदणी

SCROLL FOR NEXT