team india google
Sports

T-20 World Cup IST Timings: टी २० वर्ल्डकप सामने बघायचेत? तर उडेल झोप! पाहा किती वाजता सुरु होतील सामने

ICC T20 World Cup Timings In India: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचे सामने किती वाजता सुरु होतील? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. वेळेत फरक असल्यामुळे ही स्पर्धा 1 तारखेला जरी सुरू होत असली तरी भारतात ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांसह एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी रंगणार आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील चारही सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. तर साखळी फेरीतील काही सामने वेस्टइंडिजमध्ये खेळले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला जर सर्व सामने पाहायचे असतील तर जागरण करावं लागू शकतं. कारण काही सामने रात्री साडेबारा तर काही सामने सकाळी पाच वाजता देखील सुरू होणार आहेत.

भारतीय संघाचे सामने किती वाजता सुरू होतील ?

तुम्हाला जर भारतीय संघाचे सामने पाहायचे असतील, तर जागरण करायची गरज भासणार नाही. कारण भारतीय संघाचे सुरुवातीचे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. तर शेवटचा एक सामना फ्लोरिडामध्ये खेळला जाणार आहे. हे सामने न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतील. तर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील. तर फ्लोरिडामध्ये होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल तर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल.

मात्र तुम्ही जर कट्टर क्रिकेटप्रेमी असाल आणि सर्व सामने पाहायचे असतील तर तुम्हाला सकाळी 5,सकाळी 6, रात्री 8, रात्री 9, रात्री 10:30 आणि रात्री 12:30 वाजताही सामने पाहण्यासाठी जागरण करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT