icc t20 world cup 2024 timetable scheudle date venue team know everything saam tv
Sports

T20 World CUP 2024: नोट करून ठेवा!टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची तारीख ठरली; वाचा केव्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना

ICC T20 World Cup 2024 Timetable: वाचा केव्हा सुरू होणार टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा.

Ankush Dhavre

ICC T20 World Cup 2024 Timetable:

आगामी वनडे वर्ल्डकप सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या आयोजनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

या स्पर्धेला ४ जून २०२४ रोजी होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील सामने अमेरिकेतील फ्लोरिडा,डल्लास आणि न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणार आहेत. दरम्यान जाणून घ्या या स्पर्धेबद्दल सर्वकाही.

केव्हा रंगणार भारत-पाकिस्तान सामना ?

माध्यमातील वृत्तानूसार भारत- पाकिस्तान सामना याच्यांत होणारा सामना आइजनहावर पार्क येथे होऊ शकतो. हे स्टेडियम न्यूयॉर्कमध्ये आहे. या स्पर्धेत एकुण २० संघ खेळताना दिसून येणार आहेत.

या २० संघांना ४ गटांमध्ये विभागलं जाणार आहे. या ४ गटांमधून प्रत्येकी २-२ संघ टॉप ८ मध्ये प्रवेश करतील. या ८ संघांना २ गटांमध्ये विभागलं जाईल. या दोन्ही गटातून प्रत्येकी २-२ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. (Latest sports updates)

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. या स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानला धुळ चारत जेतेपदाचा मान मिळवला होता. यावेळी इंग्लंडचा संघ गतविजेता म्हणून मैदानावर उतरणार आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.

त्यानंतर भारतीय संघाला एकही विजय मिळवता आला नाही. २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघ २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT