Ishan Kishan and Abhishek Sharma in T20 Ranking saam tv
Sports

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर; अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला; टॉप १० मध्ये कोण-कोण?

icc t20 rankings ishan kishan becomes number one batter : आयसीसी टी २० रँकिंगमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अभिषेक शर्माला अव्वल स्थान गमवावं लागलं असून, भारताच्या युवा खेळाडूनं पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

Nandkumar Joshi

आयसीसी टी २० रँकिंगमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. बऱ्याच काळापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माला मोठा धक्का बसला आहे. त्यानं अव्वल स्थान गमावलं आहे. त्याची जागा भारताच्या युवा खेळाडूनं घेतली आहे. विस्फोटक फलंदाज इशान किशन हा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर भारतीय संघातून वगळलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे टॉप १० मधील स्थानही धोक्यात आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेच्या दरम्यान यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

इशान किशन आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

भारत विरुद्ध आयर्लंड टी २० मालिका संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. भारताचा युवा फलंदाज इशान किशन पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याच्या रेटिंगमध्ये वाढ होऊन ती ८७६ वर पोहोचली आहे. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च रेटिंग आणि रँकिंगसुद्धा आहे. तो पहिल्यांदाच रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी तो दुसऱ्या स्थानी होता. मागील काळात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याने अव्वल स्थान मिळवलं आहे.

अभिषेक शर्मा-इशान किशनमध्ये फक्त काही रेटिंगचं अंतर

अभिषेक शर्मा हा पहिल्या स्थानी होता. मात्र, त्याचं स्थान घसरलं आहे. एका स्थानाचं नुकसान होऊन तो दुसऱ्या स्थानी घसरला आहे. अभिषेकच्या रेटिंगमध्ये घट होऊन ती ८६९ झाली आहे. इशान आणि अभिषेकच्या रेटिंगमध्ये खूप कमी अंतर आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत दोन्ही खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे त्यात पुन्हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका होणार आहे.

सूर्यकुमार यादवचे मोठे नुकसान

टीम इंडियातून वगळण्यात आलेला सूर्यकुमार यादव याचं मोठं नुकसान झालं आहे. एका स्थानाने त्याची घसरण झाली आहे. तो आधी सातव्या स्थानी होता. आता आठव्या स्थानी आहे. भारतीय संघाने सूर्यकुमारशिवाय दोन सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याची रेटिंग घसरली आहे. त्याचा फायदा जोस बटलर याला झाला आहे. तो एका स्थानाने पुढे सरकला असून, सातव्या स्थानी पोहोचला आहे. बटलरचे रेटिंग ७१६ असून, सूर्यकुमारची रेटिंग ७०८ इतकी आहे. उर्वरित टी २० रँकिंगच्या टॉप १० मध्ये फारसा बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT