ICC T20 Rankings x
Sports

ICC T20 क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवचे नुकसान, तर तिलक वर्माची गगनभरारी, हार्दिक अद्याप...

Suryakumar Yadav ने आयसीसी टी २० क्रमवारीतला अव्वल स्थान गमावले आहे. तिलक वर्माने यादीच्या टॉप ३ मध्ये स्थान मिळवले आहे. आयसीसीच्या नव्या यादीत कोण वरचढ ठरले आहे आणि कोण खाली गेले आहे, चला जाणून घेऊयात...

Yash Shirke

ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (११ जून) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज टी २० मालिकेनंतर आयसीसीची नवीनतम क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत इंग्लंडचा स्टार गोलंदाज आदिल रशीदला सर्वात जास्त फायदा झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ४ बळी घेणाऱ्या रशीदने यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. भारताचा वरुण चक्रवर्ती ७०६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर काय आहे. तिलक वर्माची फलंदाजांची क्रमवारीत वढती झाली आहे, तर सूर्यकुमार यादवला नुकसान सहन करावे लागले आहे.

आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान सूर्यकुमार यादवने गमावले आहेत, तो टॉप ५ मधून बाहेर पडला आहे. इंग्लंडच्या जोस बटलरने सूर्याला सहाव्या क्रमावर ढकलले आहे. बटलर पाचव्या, तर सूर्यकुमार सहाव्या क्रमाकांवर आहे. सूर्याचा नंबर घसरल्याचा फायदा तिलक वर्माला झाला आहे. तिलक टॉप ३ मध्ये ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यासोबत सामील झाला आहे. फिल सॉल्ट यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजचा शाई होप आणि इंग्लंडचा बेन डकेट यांनाही फलंदाजीच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. मालिकेत ९७ धावा करणाऱ्या होपने क्रमवारीत झेप घेत १५ वा स्थान गाठले आहे. दुसऱ्या बाजूला बेन डकेट ४८ व्या स्थानावर १६ व्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्या मागे गेल्याने ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड नंबर १ टी २० फलंदाज बनला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये फारसा फरक झालेला नाही. भारताचा हार्दिक पंड्या २५२ या सर्वोच्च रेटिंगसह अजूनही अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूला, इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर घसरला आहे. टॉप १० च्या क्रमवारीत हार्दिक पंड्या एकटाच भारतीय खेळाडू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, फ्लायओव्हरच्या कड्याला दुचाकी जोरात धडकली; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Cervical cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं निदान होण्यास उशीर का होतो? काय आहेत कारणं?

Hair Mask : मेथीच्या दाण्यांच्या हेअर मास्कने केस गळती थांबवा

Make Yourself Happy: स्वतःला खुश ठेवण्याचे हे ७ मार्ग माहिती आहेत का?

Solar Agri Pump: सौर कृषी पंपची चोरी झालीय? कुठे कराल तक्रार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

SCROLL FOR NEXT