वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली.  social media
Sports

T20 Ranking : वाह सरपंच साहेब! टी २० रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरचा धमाका, टॉप टेनमध्ये किती भारतीय फलंदाज?

Shreyas Iyer enters top 10 in T20 international rankings : आयसीसीनं टी २० रँकिंग जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं मोठी झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तडाखेबंद शतकाचा फायदा अय्यरला झाला.

Nandkumar Joshi

शांत, संयमी, बोलंदाजी कमी, पण धारदार फलंदाजी, पहिल्याच टी २० सामन्यात वेस्ट इंडिजची जोरदार धुलाई करणारा 'सरपंच' आणि भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सरस कामगिरी केलीय. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या रँकिंगमध्ये अय्यरने हनुमान उडी घेत थेट टॉप टेनमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे.

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं वेस्ट इंडिजविरुद्ध मंगळवारी झालेल्या टी २० सामन्यात तडाखेबंद शतक ठोकलं. डोळ्यांचं पारणं फेडणारी त्याची खेळी होती. त्याच्या काही तासांतच आयसीसीने टी २० रँकिंग जाहीर केली. शतकी खेळीचा श्रेयस अय्यरला चांगलाच फायदा झाला. रँकिंगमध्ये अय्यरनं जबरदस्त झेप घेतली. त्याला १८ स्थानांचा फायदा झाला असून, तो थेट अव्वल दहा जणांच्या यादीत पोहोचला. तर 'घातक' फलंदाज ईशान किशन पहिल्या स्थानी कायम आहे.

ईशान किशन नंबर १, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी २० मालिका सुरू आहे. त्याचवेळी आयसीसीने टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंग जाहीर केली आहे. त्यात भारताचा स्टार युवा फलंदाज ईशान किशन हा पहिल्या स्थानी कायम आहे. त्याची रेटिंग ९०२ आहे. त्याच्या रेटिंगमध्ये घसरण झाली असली तरी, पहिलं स्थान कायम असून, सध्या तरी त्याच्या आसपास कुणी नाही. तर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. त्याची रेटिंग ८८७ आहे.

श्रेयस अय्यरची १८ स्थानांची झेप

ताज्या क्रमवारीत सर्वाधिक फायदा श्रेयस अय्यरला झाला. अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात अवघ्या ४३ चेंडूंत १०२ धावांची तुफानी खेळी केली. त्यात दहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याचं हे पहिलं शतक आहे. या खेळीच्या जोरावर टी २० रँकिंगमध्ये अय्यरने मोठी झेप घेतली आहे. त्याला १८ स्थानांचा फायदा झाला असून, ७८६ रेटिंगसह तो थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टॉप ५ मध्ये संधी

श्रेयस अय्यरची ही आतापर्यंतची सर्वोच्च रेटिंग आहे. यापूर्वी अय्यर ६११ रेटिंगसह २५ व्या स्थानी होता. आता त्याची रेटिंग ६३० आहे. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील चार सामने व्हायचे आहेत. जर या सामन्यांमध्ये अय्यरने चांगली कामगिरी केली तर, त्याला टी २० क्रमवारीत अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवण्याची नामी संधी आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता १३ व्या स्थानी पोहोचलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरच्या मिरी येथे उपबाजारासाठी ४ हेक्टर जमीन, महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

राहुल गांधींना खांद्यावर उचलून नेत गाडीत कोंबलं; प्रियंका गांधींचा रस्त्यावर ठिय्या, जंतर-मंतरवर हाय होल्टेज ड्रामा

Political News: ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर इंडिया आघाडीत फूट? अवघ्या काही तासांत मोठ्या घडामोडी

Fort : किल्ल्यात बांधला पाणी महाल; शाही वास्तुकला पाहून थक्क व्हाल, लोकेशन नोट करा

Cold Or Hot Water : थंड की गरम, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

SCROLL FOR NEXT