T-20 World Cup: पहिले 6 सामने 'या' देशात खेळवले जाणार Twitter/ @BCCI
Sports

T-20 World Cup: पहिले 6 सामने 'या' देशात खेळवले जाणार

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान (Omam) मध्ये खेळला जाणार आहे.

वृत्तसंस्था

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान (Omam) मध्ये खेळला जाणार आहे. यासाठी तयारी सुरू झाली आहे. युएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपचे पहिले सहा पात्रता सामने ओमानमध्ये खेळले जातील, तर उर्वरित सहा सामने दुबईच्या ओव्हल स्टेडियमवर खेळले जातील.

मुख्य फेरीचे सामने युएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अबू धाबीचे शेख झायेद स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या तीन मैदानावर होतील. इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) उर्वरित सामने टी-20 विश्वचषकाच्या अगोदर खेळवले जातील. अशा प्रकारे, जे खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतील त्यांना या मेगा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्याची संधी मिळणार आहे.

टी -20 वर्ल्ड कप दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिल्या फेरीत गट-अ मधील श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स आणि नामीबिया आणि बांगलादेश, ग्रुप बी मधील ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड यांचा सामना होणार आहे. दोन्ही गटातील पहिले दोन संघ सुपर -12 फेरीत प्रवेश करतील. त्याचे प्रारंभिक सहा सामने ओमानमध्ये आणि त्यानंतरचे सहा सामने दुबईच्या ओव्हल स्टेडियमवर खेळले जातील. अशा प्रकारे, मुख्य स्टेडियममध्ये आयपीएलनंतर टी -२० विश्वचषकातील इतर सामन्यांची तयारी होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की "ओमानला आतापर्यंत सहा सामने देण्यात आले आहेत. ओमान क्रिकेट असोसिएशनला उर्वरित सहा पात्रता सामने आयोजित करण्याची देखील इच्छा आहे. आम्ही यावरही विचार करीत आहोत. हे माहित आहे की पात्रता फेरीतील गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता ग्रुप-१ मधील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या विरुद्ध सुपर -12 सामन्यात खेळेल. त्याचबरोबर ग्रुप-बी चा विजेता आणि ग्रुप -1 च्या उपविजेतेपदाचा सामना सुपर -12 मधील गट -2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानशी होईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT