Abhishek Sharma vs Ishan Kishan social media
Sports

एकाच वेळी T20 - कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; ३५ चेंडूंत शतक ठोकणारा फलंदाज नंबर १

ICC t20 Ranking Update : आयसीसी टी २० आणि कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर झालाय. अवघ्या ३५ चेंडूंत तुफानी शतकी खेळी करणारा भारताचा अभिषेक शर्मा यानं पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

Nandkumar Joshi

Latest ICC T20 batting rankings update : आयसीसी टी २० क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली. भारताचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा यानं इशान किशनला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी साजेशी होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानचा साहिबजादा फरहान हा पहिल्या स्थानी होता. मात्र, वेस्ट इंडिज आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीचा फायदा त्याला यावेळच्या क्रमवारीत झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात त्याने तुफानी शतक ठोकलं आणि अव्वल स्थानी विराजमान झाला.

भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशन याला अभिषेक यानं मागे टाकलं आहे. बऱ्याच काळापासून तो अव्वल स्थानी होता. मात्र, दुखापतीमुळे तो मागील दोन सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या रेटिंग पॉइंटमध्ये घसरण झाली. दुसरीकडे कसोटी क्रमवारीतही मोठा फेरबदल झाला. मार्को यानसेन यानं इतिहास रचला आहे.

यानसेन हा एकाचवेळी आयसीसी कसोटीच्या गोलंदाजी क्रमवारीत आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. ही त्याची ऐतिहासिक कामगिरी आहे. गोलंदाजीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याला जोरदार झटका दिला आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत त्यानं भारताच्या रविंद्र जडेजाला धक्का दिला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर याने कसोटी रँकिंगमध्ये पहिल्यांदाच अव्वल १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने १५ स्थानांची झेप घेत आठव्या स्थानी पोहोचला आहे.

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट आणि कर्णधार हॅरी ब्रुक याने टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. तर टॉप १० मधून जो रूट आणि कुसल मेंडिस हे दोघे बाहेर फेकले गेले आहेत. भारताचे चार फलंदाज टॉप १० मध्ये आहेत. शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर, विराट कोहली तिसऱ्या, तर रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. १० व्या क्रमांकावर केएल राहुल आहे.

टी २० रँकिंगमध्ये टॉप ५ फलंदाज

आयसीसी टी २० रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा ८९७ रेटिंग पॉइंटसह पहिल्या स्थानी, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान हा तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात ८८३ रेटिंग पॉइंट आहेत. इशान किशन ८६६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी घसरला आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रुक हा चौथ्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात ७९३ पॉइंट आहेत. जोस बटलर ७८९ पॉइंटसह पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : रायगडमध्ये पुन्हा शिवसेना-एनसीपीमध्ये संघर्षाची ठिणगी

Diwali Health : दिवाळीचा फराळ बिनधास्त खा! वजन वाढू नये म्हणून करा फक्त 'या' ३ गोष्टी

कोरडा खोकला सतावतोय? झटपट आरामासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

4 Types Vadapav Recipe: तोच तोच वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा 4 प्रकारचे चमचमीत वडापाव!

Kitchen Tips : थंडीच्या दिवसांत फ्रिजचं कुलिंग किती असावं? ९०% गृहिणी करतात ‘ही’ चूक!

SCROLL FOR NEXT