india vs pakistan match tickets  saam tv
Sports

IND vs PAK Match Tickets: तारीख ठरली! या दिवशी मिळणार भारत- पाकिस्तान सामन्याचं तिकीट; कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या

World Cup 2023: आयसीसीने भारत - पाकिस्तान सामन्याच्या ऑनलाइन तिकिटांच्या बुकिंगला सुरुवात केव्हा होणार याबाबत अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan Match Tickets Booking:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १४ ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

आयसीसीने भारत - पाकिस्तान सामन्याच्या ऑनलाइन तिकिटांच्या बुकिंगला सुरुवात केव्हा होणार याबाबत अपडेट दिली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी १५ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होणार आहे. यासह सेमीफायनल आणि फायनल सामन्याचे तिकीट देखील याच दिवशी बुक करता येणार आहे.

केव्हा आणि कसं करायचं बुक?

आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, या सामन्यासाठीचे तिकीट कधीपासून आणि कसे बुक करायचे. वर्ल्डकप स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. हे सामने पाहण्यासाठी देखील क्रिकेट चाहत्यांना तिकीट घेणं अनिवार्य असणार आहे.

आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे की, वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यांसह सराव सामन्यांचे तिकीट बुक कसं करायचं याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र आता सुधारीत वेळापत्रकानूसार हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

SCROLL FOR NEXT