shubman gill twitter
Sports

ICC ODI Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! गिल नंबर १.. टॉप -१० मध्ये ४ भारतीय फलंदाज

ICC ODI Ranking: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आयसीसीने वनडे फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. या यादीत शुभमन गिलने अव्लल स्थान गाठलं आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. ही स्पर्धा सुरु असताना आयसीसीने वनडे फलंदाजांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने बाजी मारली आहे. बाबर आझमला मागे सोडत गिल वनडे फलंदाजांच्या यादीत नंबर १ स्थानी पोहोचला आहे. मुख्य बाब म्हणजे या रँकिंगमधील टॉप १० फलंदाजांच्या यादीत ४ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.

ही यादी जाहीर होण्यापूर्वी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम अव्वल स्थानी होता. आता तो दुसऱ्या स्थानी घसरला आहे. बाबरची रेटींग ७७३ इतकी आहे. तर गिलने ७९६ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थानी कब्जा केला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा ७६१ रेटींग पॉईँट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हेनरिक क्लासेन ७५६ रेटींग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरील मिशेल ७४० रेटींग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी आहे. विराट कोहली सहाव्या स्थानी आहे. तर श्रेयस अय्यर नवव्या स्थानी पोहोचला आहे.

गिलचा शानदार फॉर्म

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी शुभमन गिलकडे भारतीय वनेड संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मालिकेत त्याच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे. इग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली.

त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने शतक पूर्ण केलं. या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याने ८६.३३ च्या सरासरीने २५९ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरने ३ सामन्यांमध्ये ६०.३३ च्या सरासरीने १८१ धावा केल्या होत्या. या मालिकेत गिल आणि रोहितने देखील शानदार शतकी खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT