ICC ODI Batting Rankings team india shubman gill climbs no4 spot Latest Sport Updates  Saam TV
Sports

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप; पाकच्या तगड्या खेळाडूला टाकलं मागे

ICC ODI Batting Rankings: टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने ७४३ रेटिंग्स पॉईंटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज फखर जमानलाही मागे टाकलं आहे.

Satish Daud

ICC ODI Batting Rankings: आंततराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयीसीसीने पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यानंतर वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने ७४३ रेटिंग्स पॉईंटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज फखर जमानलाही मागे टाकलं आहे. (Latest Marathi News)

यापूर्वी शुभमन गिल पाचव्या स्थानावर होता. मात्र, आता तो चौथ्या स्थानावर पोहचला आहे गिलच्या नावावर ७४३ रेटिंग्स पॉइंट्स जमा झाले आहेत. शुबमन गिल २०२३ वर्षात धमाकेदार कामगिरी करत आहेत. गिलने या वर्षात आतापर्यंत एकूण १२ वनडे सामने खेळले असून ७५० धावा कुटल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि २ अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा हायस्कोअर २०८ धावा आहे.

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण कुठल्या स्थानावर?

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम याने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर इमाम उल हक तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम याला अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही.

या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ११ व्या स्थानी कायम आहे. तर कसोटीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा पहिल्या स्थानी आहे. तर रविंद्र जडेजा यानेही अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.

जसप्रीत बुमराहला टी-20 रँकिंगमध्ये फायदा

प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराला टी-20 रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात प्रभावशाली कामगिरी केल्यानंतर जसप्रीत बुमराहला ७ स्थानांचा फायदा झाला असून तो गोलंदाजीत ८४ व्या स्थानावर पोहचला आहे.

याशिवाय लेगस्पिनर रवी बिश्नोईने १७ क्रमांकाची झेप घेत ६५ व्या स्थानावर मजल मारली आहे. सूर्यकुमार यादव हा टी-20 बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT