T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match Update: Saamtv
Sports

India vs Pakistan: T20 वर्ल्डकपमध्ये हायहोल्टेज लढत! बलाढ्य भारत- पाकिस्तानविरुद्ध लढणार; कधी अन् कसा पाहाल सामना? जाणून घ्या

T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match Update: टी ट्वेंटी विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज लढत होणार आहे. कसा पाहाल हा सामना? जाणून घ्या सविस्तर.

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषकात आज बलाढ्य भारतीय संघ आणि पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. न्यूयॉर्कमधील नसाउ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. क्रिकेटच्या मैदानातील सर्वात हायहोल्टेज लढतींकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

आज भारत पाकिस्तान लढत!

देशभरासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असते ती भारत- पाकिस्तान सामन्याची. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओखळले जाणारे हे दोन संघ आज आमने- सामने येणार आहेत. एकीकडे बलाढ्य भारतीय संघ समोर असताना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला आजचा सामना जिंकावा लागणार आहे.

कसा पाहाल सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. त्याच वेळी, अमेरिकन वेळेनुसार, सकाळी 10.30 पासून हा सामना खेळला जाईल. . भारतीय क्रिडा प्रेमींना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि टॅबलेट वापरकर्ते डिस्ने हॉटस्टार ॲपवर लाइव्ह सामना पाहता येईल.

कोणाचे पारडे जड?

T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान 7 वेळा आमनेसामने आले आहेत. पहिल्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ २ वेळा आमने सामने आले आणि टीम इंडियाने अंतिम फेरीसह दोन्ही सामने जिंकले. यानंतर भारताने पुढील 5 पैकी 4 सामने जिंकले. म्हणजे टीम इंडियाने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 2021 मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, हा कोणत्याही विश्वचषकात टीम इंडियाविरुद्धचा एकमेव विजय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT