वर्ल्डकपचा १५व्या सामना आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात नेदरलँडने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३८ धावांनी पराभूत केलं. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नेदरलँडच्या संघाने दिलेल्या २४५ धावांचे आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दमछाक उडाली.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आर्श्चयकारक सामने पहायला मिळत आहेत. हे सामने पाहताना क्रिकेट चाहत्यांचा श्वास रोखले जात आहेत. वर्ल्डकपमधील दोन धक्कादायक निकाल पाहून क्रिकेट खरचं अनिश्चितेचा खेळ असल्याच्या म्हणीवर शिक्कामोर्तेब झालं. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला पराभूत केलं. आज कमकुवत समजल्या जाणाऱ्या नेदरलँडच्या संघाने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत केलं. नेदरलँडच्या संघाने १६ वर्षानंतर एकदिवसीय वर्ल्डकपमधील पहिला विजय आज मिळवला.
नेदरलँडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सळो की पळो करू सोडलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात आधी खूप खराब झाली होती. परंतु फलंदाजांनी आपला खेळ सावरत आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. एका पाठोपाठ एक आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडण्यास सुरूवात केली.
नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने ७८ धावांची नाबाद खेळी करत संघाला २४५ धावांच्या शिखरावर नेले. यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाजी हे आव्हान पार करताना दमदार सुरूवात करेल अशी अपेक्षा होती. स्पर्धेत दोन शतके ठोकलेला क्विंटन डिकॉकवर आफ्रिकेची मदार होती. त्याने आपल्या डावाची सुरूवात देखील आक्रमक केली. परंतु मात्र २२ चेंडूत २० धावा केल्यानंतर एकरमनने त्याला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. डिकॉक आठव्या षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर नेदरलँडने आफ्रिकेला १० व्या ११ व्या आणि १२ व्या षटकात असे सलग तीन धक्के देत त्यांचे तोंडचे पाणी पळवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.