cricket 
क्रीडा

आयसीसीला ऑलिंपिकचे वेध; क्रिकेटच्या समावेशासाठी घेतला पुढाकार

Siddharth Latkar

सातारा : आयसीसीने ICC ऑलिम्पिक खेळात क्रिकेटच्या Cricket समावेशासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. खेळाचा समावेश व्हावा यासाठी बोली लावण्याची तयारी दर्शवली आहे. तशी पावले देखील टाकण्यास प्रारंभ केला आहे. याबराेबरच लॉस एंजेलिस २०२८ Los Angeles 2028 हे मुख्य लक्ष्य असणार आहे. दरम्यान आयसीसीचे एक कार्यसमूह बोलीचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र आले आहे.

तीस लाख क्रिकेट चाहते अमेरिकेत राहतात, LA 2028 मधील ऑलिम्पिक Olympics स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी उत्तम खेळ बनवू.

आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदा क्रिकेट खेळला गेला. सन 1900 मध्ये पॅरिसला. फक्त दोन संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्स. आता सन २०२८ मध्ये क्रिकेटचा ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश झाल्यास १२८ वर्षांचा प्रदिर्घ कालावधीची प्रतिक्षा संपेल अशी आशा आहे.

पुढच्या वर्षी बर्मिंघम २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट असेल. त्यावेळीच्या प्रदर्शनाने खेळाचे महत्व आणि परिपुर्णता या खेळाचे ऑलिम्पिकमधील महत्व निश्चित करेल.

ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात क्रिकेटचा समावेश करणे हे क्रिकेटसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल असे आयसीसीचे प्रमुख ग्रेग बार्कले यांनी नमूद केले.

आयसीसीच्या वतीने त्यांनी आयओसी, टोकियो २०२० आणि जपानच्या लोकांचे कठीण परिस्थितीत अशा अविश्वसनीय खेळ आयोजित केल्याने अभिनंदन केले. ते म्हणाले हे पाहणे खरोखरच विलक्षण होते आणि जगाची कल्पनाशक्ती पकडली आणि भविष्यातील खेळांचा एक भाग म्हणून आम्हाला क्रिकेट आवडेल या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठीच्या बोलीसाठी एकजुट झालेली आहे. क्रिकेटच्या दीर्घकालीन भविष्यासाठी ऑलिम्पिकलाचा समावेश महत्वाचा वाटताे. जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक चाहते क्रिकेटचे आहेत आणि त्यापैकी ९० टक्के चाहत्यांना ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पहायाचे आहे असे बार्कले यांनी नमूद केले.

बार्कले म्हणाले क्रिकेटला एक मजबूत आणि उत्कट फॅनबेस आहे, विशेषत: दक्षिण आशियामध्ये जिथे ९२ टक्के चाहते येतात तर यूएसएमध्ये ३० दशलक्ष लाेक क्रिकेटवेडे आहेत. या चाहत्यांना त्यांच्या नायकांना ऑलिम्पिक पदकासाठी स्पर्धा करताना पाहण्याची संधी मिळणे ही बाब आनंददायक आहे.

क्रिकेटचा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात एक उत्तम निर्णय ठरले परंतु क्रिकेटचा समावेश करणे हे सोपे नाही याची आम्हांला कल्पना आहे. कारण येथे इतर अनेक खेळही त्यांचा स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी प्रतिक्षेत आहेत. परंतु आम्ही निर्धार केलेला आहे क्रिकेटचा स्पर्धांत समावेश व्हावा जेणेकरुन क्रिकेट आणि ऑलिम्पिकची भागीदारी काय करु शकते ही दाखवण्याची संधी आहे.

आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे अध्यक्षस्थानी इंग्लंड असेल आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इयान वॅटमोर असतील. त्यांच्यासोबत आयसीसीचे स्वतंत्र संचालक इंद्रा नूयी, झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेन्गवा मुकुहलानी, आयसीसीचे सहयोगी सदस्य संचालक आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष महिंदा वल्लीपुरम आणि यूएसए क्रिकेटचे अध्यक्ष पराग मराठे यांचा समावेश असेल.

क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये दीर्घ प्रतीक्षित पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. शोपीस इव्हेंटमध्ये खेळाचा समावेश केल्याने यूएसएमध्ये खेळाच्या वाढीस गती मिळेल असा आत्मविश्वास मराठे यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, "यूएसए क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी बोलीला समर्थन देण्यास उत्सुक आहे. ही वेळ यूएसएमध्ये खेळ विकसित करण्याच्या आमच्या सततच्या योजनांशी पूर्णपणे जुळते.

यूएसएमध्ये उत्साही क्रिकेट चाहते आणि खेळाडू आहेत. याबराेबरच जागतिक स्तरावर क्रिकेटप्रेमी असल्याने खेळााच लॉस एंजेलिस २०२८ मधील ऑलिम्पिक खेळांत समावेश झाल्यास खूप मोलाची गाेष्ट ठरले. यामुळे आम्हांला आमचे लक्ष्य साध्य करण्यात मदत हाेईल. क्रिकेटला मुख्य प्रवाहातील खेळ म्हणून देशात स्थापित करण्याचा हेतु साध्य हाेण्यासाठी देखील मदत हाेईल असे मराठे यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT