eng vs pak yandex
Sports

ICC Champions Trophy: टीम इंडियानंतर आता इंग्लंडने या संघासोबत खेळण्यास दिला नकार; कारणही सांगितलं

England Cricket Team, ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची घोषणा झाल्यापासून ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात आहे. आधी बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास कसून विरोध केला.

अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला बीसीसीआयसमोर झुकावं लागलं. या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान या भारताचा पाकिस्तानात जाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर आता इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे.

इंग्लंडचा अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार?

ब्रिटेनत्या संसदेतील १६० सदस्यांनी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डकडे खास मागणी केली आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध न खेळू देण्याची मागणी केली आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये असलेली तालिबानची सत्ता. तालिबान सरकारने महिलांच्या हक्कांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ब्रिटेन अफगाणिस्तानच्या विरोधात आहे.

पार्लमेंटरी चेंबर्समधील हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांनी ईसीबीकडे खास मागणी केली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारकडून मुलींच्या आणि महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या अत्याचाराविरोधात आपला आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. तालिबान सरकारने महिलांना खेळांपासून दुर नेलं आहे. ब्रिटेन सरकार या विरोधात आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचार्ज गाऊल्ड यांनी म्हटले की, ' अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा ईसीबी निषेध करते. ईसीबीने अफगाणिस्तानविरुद्ध कुठल्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका न खेळण्याचा नकार दिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT