rohit sharma | Virat Kohli
rohit sharma | Virat Kohli saam tv
क्रीडा | IPL

ICC T20 Rankings: रोहितच्या नेतृत्वात भारताची बाजी; जाणून घ्या संपुर्ण क्रमवारी

Pravin

भारताचा नवीन कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने आपला 2021-22 चा हंगामा संपवला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) जगातील आयसीसी क्रमवारीत (ICC T-20 Ranking) पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला आहे. आज आयसीसीने वार्षिक क्रमवारी जाहीर केली त्यामध्ये भारतीय संघ T-20 क्रमवारीत अव्वल आहे. भारत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा पाच गुणांची आघाडीवर आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मागे टाकले असून ते आता सहाव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश आणि श्रीलंकेने अफगाणिस्ताला मागे टाकले आहे.

2021 च्या संयुक्त अरब अमिरात आणि ओमान येथे झालेल्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करूनही, भारतीय क्रिकेट संघाने गेल्या मोसमात टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मालिकेत न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने संघाची कमान हाती घेतली होती.

इंग्लंड 265 पॉईंटसह दुसऱ्या तर पाकिस्तान 261 पॉईंटससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे 253 पॉईंट आहेत. ऑस्ट्रेलियानेही क्रमवारीत एका स्थानाची कमाई केली आहे. त्यांचे आता 251 पॉईंट आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंड 250 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तर वेस्ट इंडिज 240 पॉईंटसह सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश (233 गुण) आणि श्रीलंका (230 गुण) हे दोन्ही संघ अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तान क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

SCROLL FOR NEXT