jasprit bumrah yandex
Sports

ICC Test Rankings : जे कोणालाच नाही जमलं ते बुमराहने करून दाखवलं; BGT गाजवताच ICC ने केली मोठी घोषणा

Jasprit Bumrah, ICC Test Rankings: आयसीसीने कसोटी रँकिंगची घोषणा केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फायदा झाला आहे.

Ankush Dhavre

आयसीसीने गोलंदाजांची रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठी झेप घेतली आहे. बुमराह कसोटी क्रिकेटमधील नंबर १ गोलंदाज आहे. आता त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे.

नुकताच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत त्याने सर्वाधिक ३२ गडी बाद केले होते. या दमदार गोलंदाजीच्या बळावर त्याची कसोटी रँकिंग ९०८ वर जाऊन पोहोचली आहे. यासह वर्तमानात ९०० पेक्षा अधिक रँकिंगची कमाई करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत दमदार गोलंदाजी

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्याने या मालिकेत सर्वाधिक ३२ गडी बाद केले होते. भारताने मालिका गमावली, पण बुमराहने दमदार गोलंदाजी करून सर्वांचीच मनं जिंकली. ही मालिका भारतीय संघाने १-३ ने गमावली. यासह भारतीय संघाने १० वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली.

बुमराह नंबर १, पंतची टॉप १० मध्ये धडक

भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज गेले काही महिने टॉप १० मध्ये कायम होता. मात्र त्याला टॉप १० मधून बाहेर पडावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा त्याने टॉप १० मध्ये धडक दिली आहे. पंत आता ९ व्या स्थानी पोहोचला आहे. यासह भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानी पोहोचला आहे. टॉप १० फलंदाजांच्या यादीत केवळ २ भारतीय फलंदाज आहेत.

सिडनी कसोटीत प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. या संधीचा त्याने दोन्ही हातांनी स्वीकार केला. या सामन्यात त्याने ६ गडी बाद केले. याचा फायदा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये झाला आहे. तो ९३ व्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT