Harbhajan Singh vs Sreesanth saam tv
Sports

श्रीसंतच्या मुलीचे ते शब्द अन् माझ्या डोळ्यात अश्रू, थप्पडकांडाच्या १८ वर्षानंतरही हरभजनला पश्चाताप

Harbhajan Singh S Sreesanth News : १८ वर्षांपूर्वी झालेल्या थप्पडकांडाबद्दल हरभजन सिंह याला अजूनही पच्छाताप होतोय. श्रीसंत याच्या मुलीचे ते शब्द ऐकून हरभजनला रडू आले होते. या घटनेवरून हरभजन सिंह याने २०० वेळा माफी मागितली.

Namdeo Kumbhar

Harbhajan Singh says I made a mistake; feel ashamed : १८ वर्षानंतरही भारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंहला चुकीचा पश्चाताप होतोय. २००८ मध्ये आयपीएल सामन्यानंतर हरभजन सिंहने रागाच्या भरात श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त घटनामध्ये पहिल्या क्रमांकावर असेल. पण या घटनेचा हरभजनला आजही पश्चाताप होतोय. आर. अश्विन यानं घेतलेल्या मुलाखतीत हरभजन याने या प्रसंगावरून पुन्हा माफी मागत ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे म्हटले. श्रीसंत हिच्या मुलीनं माझ्यासोबत हातही मिळवला नाही, हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, असे हरभजन म्हणाला.

आयुष्यातील एखादी गोष्ट अथवा निर्णय बदलायचा असेल तर तो कोणता असेल? असा प्रश्न आर. अश्विन यानं मुलाखतीत हरभजन सिंह याला विचारला. त्यावर हरभजन सिंह यानं एस श्रीसंत याच्यासोबत आयपीएलमध्ये घडलेला प्रसंगाचा उल्लेख केला. ही माझ्याकडून आतापर्यंतची सर्वात मोठी चूक झाली. या चुकीसाठी श्रीसंत याची मी प्रत्येकवेळा माफी मागितली आहे. २०० पेक्षा जास्त वेळा श्रीसंत याची मी माफी मागितली आहे. आताही मी त्याची माफी मागतोय. ती माझी आतापर्यंतच सर्वात मोठी चूक होती, अस हरभजन म्हणाला.

श्रीसंत याच्यासोबत आयपीएलमध्ये घडलेली घटना मला त्रास देते. जे झालं ते चुकीचं झालं होतं. मी त्याला अनेकदा माफीही मागितली आहे. जे झालं ते अतिशय चुकीचं होतं. मी २०० वेळा त्याला (श्रीसंत) सॉरी बोललो असेल. त्या घटनेला खूप वर्षे झाली, पण जे झालं होतं ते चुकीचे होतं, आजही मी इथे त्याची माफी मागतोय.

मला एक गोष्टी नेहमी वेदना देणारी होतेय, ती म्हणजे या घटनेच्या खूप वर्षानंतर त्याच्या (श्रीसंत) मुलीला मी भेटलो. त्यावेळी मी प्रेमाने तिला बोलण्याचा आणि हात मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणाली "मला तुमच्याशी नाही बोलायचं. तुम्ही माझ्या वडिलांना मारलेय. " तिचे शब्द ऐकून मला खूप त्रास झाला, हृदय तुटले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. त्या मुलीसाठी मी काय चांगली छाप सोडली. हा माणूस कसाय, त्याने माझ्या वडिलांना मारलं असा विचार ती करतेय. तिचे शब्द मला वेदना देणारे होते. मी तिला आजही सॉरी म्हणतोय. जे झालं ते बदलू शकत नाही, पण मी काय करू शकतो. तू सांगेल ते मी करायला तयार आहे. मी तसा माणूस नाही, हे मी आजही तिला सांगतो. उद्या ती मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला तिचा अंकल तसा नाही असं वाटायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT