Rohit sharma on sydney test pull out saam tv
Sports

Rohit Sharma: 'त्या' मुद्द्यावरून मी गंभीर-आगरकरशी भांडलो...! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून रोहित शर्माचा मोठा खुलासा

Rohit sharma on sydney test pull out: ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला चांगला खेळ करता आला नव्हता. दरम्यान यावर आता रोहित शर्माने एक मोठ्या सिक्रेटचा खुलासा केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल सुरु असतानाच एक मोठा खुलासा केला आहे. हिटमॅनच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडालीये. यावेळी रोहित शर्माने भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजदरम्यान घेणयात आलेल्या निर्णयावर भाष्य केलंय. यामध्ये रोहितने गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्याशी वाद झाल्याचं सांगितलंय. रोहितच्या सांगण्यानुसार, ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिडनी टेस्टमधून बाहेर पडण्याच्या त्याच्या निर्णयावर कोच आणि सिलेक्टर नाखूश होते.

काय म्हणाला रोहित शर्मा?

ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माचा खेळ काही फारसा चांगला झाला नव्हता. यावेळी रोहितने ‘बियॉन्ड23 क्रिकेट पॉडकास्ट’ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला सांगितलं की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत फायनल प्लेईंग ११ मध्ये गिलचा समावेश करायचा होता. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याला तेव्हा आधीच्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मी असाच आहे.. ठीक आहे. जर मी बॉलला योग्यरित्या मारू शकत नाही तर ती हीच वेळ होती. काही गोष्टी कालांतराने बदलतील.

कोचशी झालं होतं भांडण

रोहितने पुढे सांगितलं की, मी माझ्या निर्णयाविषयी कोच आणि सिलेक्टर्सशी चर्चा केली. मात्र त्यांनी याला असहमती दर्शवली. यानंतर माझा या मुद्द्यावरून त्यांच्याशी वाद देखील झाला. तुम्ही टीमला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करता. त्यावेळी तुम्ही टीमला कशाची गरज आहे हे पाहून त्यानुसार निर्णय घेतला. कधी-कधी या गोष्टी काम करतात तर कधी नाही करत, असं होऊ शकतं. मुळात तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच याची खात्री नसते.

रोहितने स्वतःला केलं होतं टीमबाहेर

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहितने मोठा निर्णय घेत शेवटच्या टेस्ट सामन्यातून स्वतःला बाहेर ठेवलं होतं. याविषयी तो म्हणाला की, मी एडिलेड टेस्टमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही. मला टीमसाठी सुरुवात करायची होती. मुळात मला जिथे आवड आहे तिथे मी फलंदाजी करणं पसंत करतो, भले मला यश मिळो किंवा नाही. ही एक वेगळी गोष्ट आहे.

रोहितच्या म्हणण्यानुसार, मिडल ऑर्डरमध्ये निराश झाल्यानंतर मी विचार केला. काही गोष्टी ब्रिस्बेनमध्य बदलण्याचा विचार केला. मात्र तो सामना ड्रॉ झाला. ज्यावेळी आम्ही मेलबर्नला पोहोचलो तेव्हा आम्ही विचार केला की मी पुन्हा डावाची सुरुवात करण्यास उतरेन. मात्र शेवटच्या टेस्टमध्ये मला स्वतःसाठी इमानदार व्हायचं होतं. मी बॉल चांगल्या पद्धतीने खेळू शकत नव्हतो. मी स्वतःला केवळ टीमसाठी तिथे खेळणं योग्य समजत नव्हतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT