Jay Shah Spoke on Cancellation of Ishan Kishan Shreyas Iyer's BCCI Contract twitter
Sports

Ishan Kishan's BCCI Contract: इशान किशन, श्रेयस अय्यरचं BCCI कॉन्ट्रॅक्ट कुणी रद्द केलं? जय शहांनी नावासहित कारणही सांगितलं

Jay Shah On Ishan Kishan And Shreyas Iyer's BCCI Central Contract: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी इशान किशन आणि श्रेयस अय्यरला कॉन्ट्रॅक्टमधून कोणी बाहेर केलं याबबत भाष्य केलं आहे.

Ankush Dhavre

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आलं होतं. मात्र या दोघांना नेमकं बाहेर का केलं गेलं? यामागे कोणाचा हात होता हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

जय शहा यांचा मोठा खुलासा..

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यादरम्यान त्यांनी इथान आणि श्रेयस अय्यरला बाहेर करण्याचा निर्णय कोणी घेतला याबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, 'तुम्ही बीसीसीआयचं संविधान पाहू शकता. निवड समितीला बोलवणं हे आमचं काम आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बाहेर करण्याचा निर्णय अजित आगरकरांनी घेतला होता. त्या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटला पाठ फिरवली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. माझं काम निर्णयाची अंमलबजावणी करणं आहे.'

इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही भारतीय संघाबाहेर असताना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांनी नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. जय शहा यांनी संजू सॅमसनबद्दल बोलताना म्हणाले की,' आम्हाला संजू सॅमसनसारखा चांगला यष्टीरक्षक मिळाला आहे. संजू सॅमसनची टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तो पहिल्यांदाज टी-२० वर्ल्डकप खेळताना दिसून येणार आहे. तो जून महिन्यात वेस्टइंडीजमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळताना दिसून येणार आहे.'

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ..

  • रोहित शर्मा (कर्णधार)

  • विराट कोहली

  • यशस्वी जयस्वाल

  • सूर्यकुमार यादव

  • रिषभ पंत (विकेटकीपर)

  • संजू सॅमसन (विकेटकीपर)

  • हार्दिक पांड्या (उपकर्णधार)

  • शिवम दुबे

  • कुलदीप यादव

  • युजवेंद्र चहल

  • अर्शदीप सिंग

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद सिराज

  • रवींद्र जडेजा

  • अक्षर पटेल

राखीव खेळाडू ..

  • शुभमन गिल

  • रिंकू सि्ंग

  • खलील अहमद

  • आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT