how royal challengers bengaluru can qualify for playoffs know the scenario amd2000 twitter
Sports

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कसा जाणार? सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण

RCB Playoffs Scnerio: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. असं म्हटलं जात होतं की, हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल. मात्र या संघाने दमदार कमबॅक केलं आहे.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. असं म्हटलं जात होतं की, हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल. मात्र या संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करुन प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दावा केला आहे. आरसीबीने गेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

या विजयासह आरसीबीने लखनऊ सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान इथून पुढे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ६० धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह या संघाने १० गुणांपर्यंत मजल मारली आहे. आरसीबीचा नेट रनरनेट ०.२१७ इतका आहे. जो दिल्ली आणि लखनऊपेक्षा चांगला आहे. चेन्नई, दिल्ली आणि लखनऊ या तिन्ही संघांचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत.

या यादीत तिन्ही संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अव्व स्थानी, राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या स्थानी आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

आरसीबीला इथून पुढे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर होणार आहेत. आरसीबीला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. असं झाल्यास हा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो.

कसं असेल समीकरण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी पुढील दोन्ही सामने करो या मरो असणार आहेत. या संघाचा पुढील सामना १२ मे रोजी दिल्लीविरुद्ध तर १८ मे रोजी चेन्नईविरुद्ध होणार आहे. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला, तर दोन्ही संघांचे गुण समान होतील. मात्र नेट रनरेटच्या बळावर आरसीबीचा संघ आघाडी घेईल.

चेन्नईचा संघ हा आरसीबीच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा आहे. या संघाचे ३ सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जिंकल्यास हा संघ सहजरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र आरसीबीला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर प्रार्थना करावी लागेल की, चेन्नईने २ सामने मोठ्या फरकाने गमावले पाहिजे. यासह लखनऊने आपले पुढील दोन्ही सामने जिंकले तरीदेखील आरसीबीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे इतर संघांना अशी प्रार्थना करावी लागेल की, या संघाने आपले पुढील सर्व सामने जिंकले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT