rohit sahrma hardik pandya yandex
क्रीडा

Rohit- Hardik Controversy: हार्दिक अन् रोहित यांच्यातील वाद कसा मिटला? दिग्गजाने सांगितली Inside Story

Rohit Sharma -Hardik Pandya Controversy: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील वाद कसा मिटला? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र आयपीएल झाल्यानंतर दोन्ही खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकत्र खेळताना दिसून आले.

या स्पर्धेत दोघांनी मिळून शानदार कामगिरी केली आणि भारताला वर्ल्डकपही जिंकून दिला. दरम्यान दोघांमधील वाद कसा मिटला, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना पत्रकार विमल कुमार यांनी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील वाद कसे मिटले याबाबत खुलासा केला आहे. यूएसएमध्ये ज्यावेळी भारतीय संघाचा सराव सुरु होता. त्यावेळी विमल कुमारही तिथे उपस्थित होते. दोघांनी दिर्घकाळ चर्चा करुन वाद मिटवला, असं विमल कुमार यांनी सांगितलं.

विमल कुमार यांनी सांगितले की,' जेव्हा मी नेट्सजवळ गेलो, तेव्हा मी पाहिलं की दोघांमध्ये काहीच चर्चा सुरु नव्हती. पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांशी काहीच चर्चा केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की, ते दोघे आले आणि एकमेकांपासून दिर्घकाळ चर्चा केली. जिथे ते लोकं बसून गप्पा मारत होते, तिथे कुठलाही कॅमेरा नव्हता. ज्याप्रकारे ते लोकं चर्चा करत होते, ते पाहून मलाही प्रश्न पडला होता की, मी हे काय पाहतोय?'

'त्यानंतर हार्दिकने पुढील ३ दिवस सोबत गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला. ज्यावेळी मी संघातील वातावरण पाहिलं, त्यावरुन मला तरी वाटत होतं की, आता सर्व सुरळीत आहे. शेवटी काय झालं हे संपूर्ण जगाने पाहिलं.' असं विमल कुमार म्हणाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तर सामन्यातील निर्णायक षटक हार्दिक पंड्यानेच टाकलं होतं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT