mi vs srh  saam tv
Sports

MI Playoff Scenario: RCB जिंकली तरी मुंबईच जाणार Playoff मध्ये; फक्त हैदराबाद विरुद्ध खेळताना करावं लागेल 'हे' काम

How MI Will Qualify For Playoff: प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल हे आज कळणार आहे

Ankush Dhavre

IPL 2023 Playoff Scenario: आयपीएल २०२३ स्पर्धा सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. ३ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर चौथा संघ कोणता असेल हे आज कळणार आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

हा समान जिंकून पराभूत होऊन हैदराबाद संघाला फारसा फरक पडणार नाही. मात्र मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. कारण पराभूत झाल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर जाणार आहे.

मुंबईचा विजय अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाल्यास...

मुंबई इंडियन्स संघाचे १४ पॉईंट्स आहेत. जर आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला.

तर मुंबई इंडियन्स संघाचे १६ पॉईंट्स होतील. या विजयासह मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव होणं गरजेचं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय झाल्यास समीकरण काय?

मुंबई इंडियन्स संघाने हैदराबाद संघाला केवळ पराभूत करून चालणार नाही. तर हा विजय इतका मोठा असायला हवा की, मुंबईचा नेट रन रेट वाढला पाहिजे. कारण दोन्ही संघांचे पॉईंट्स सारखे आहेत. दोन्ही संघांनी विजय मिळवला तरी पॉईंट्स सारखेच राहणार आहेत.

फरक इथे नेट रन रेटमुळे पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जर १ धावेने विजय मिळवला तर मुंबई इंडियन्स संघाला ७९ धावांनी विजय मिळवावा लागेल. इतका मोठा विजय मिळवणं जरा कठीण आहे. मात्र मुंबईचा संघ इतक्या सहज पराभव स्वीकारणार नाही. (Latest sports updates)

अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा/विष्णू विनोद, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जेसन बेहरेनडॉर्फ, पीयूष चावला, आकाश मधवाल आणि ख्रिस जॉर्डन.

सनरायझर्स हैदराबाद:

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स/मयांक अग्रवाल, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन/मयांक डागर, टी नटराजन आणि नितीश रेड्डी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT