team india twitter
Sports

दिवाळीनंतर PCBचं दिवाळं निघणार? Champions Trophyचे यजमानपद गेल्यास किती नुकसान होणार?

ICC Chamions Trophy 2025: हायब्रिड मॉडेलसाठी नकार दिल्यास पाकिस्तानचे यजमानपद जाऊ शकते, दरम्यान असे झाल्यास पाकिस्तानचं किती नुकसान होईल?

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाहीये, हे बीसीसीआयने स्पष्ट केलंय. मात्र तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला वाटतंय की, भारताने पाकिस्तानात यावं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार कळवला आहे. तसेच पाकिस्तानला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये नकोय. त्यामुळे पाकिस्तानने जर या स्पर्धेचे यजमानपद सोडले, तर पाकिस्तानचं किती नुकसान होईल? जाणून घ्या.

पाकिस्तानने जर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद सोडलं, तर पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. १९९६ नंतर पाकिस्तान पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. भारताने तर स्पष्ट नकार दिला आहे. यासह पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयचा हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

पाकिस्तानचं किती नुकसान होणार?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, जर ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी दुसऱ्या कुठल्या देशात खेळवली गेली, तर पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान होणार आहे. जर स्पर्धेचे यजमानपद गेले तर पाकिस्तानला ६५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ५४८ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

या कारणामुळे वाढलं टेन्शन

पाकिस्तानला आणखी मोठा फटका बसणार आहे. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर पीसीबीने रावळपिंडी आणि लाहोर स्टेडियमचं नूतनीकरण केलं. हा खर्चही आता पीसीबीच्या अंगाशी येणार आहे.

यापूर्वी देखील आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळीही बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याचा हट्ट केला होता. शेवटी पीसीबीला भारतासमोर झुकावं लागलं होतं. भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT