चेन्नई सुपर किंग्ज संघाला पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. घरच्या मैदानावर खेळताना चेन्नईचा पंजाबने ७ गडी राखून धुव्वा उडवला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नईला पाचव्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवानंतर चेन्नईचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी इथून पुढील प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या संघाने आतापर्यंत १० सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे १० गुणांसह आणि +०.६२७ रेटींग पॉईंट्ससह चेन्नईने चौथ्या स्थानी कब्जा केला आहे. मात्र हे स्थान धोक्यात आहे. कारण चेन्नईला जर प्लेऑफमचं टिकीट मिळवायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत ४ पैकी ३ सामने जिंकणं गरजेचं असणार आहे. यासह नेट रनरेटवर देखील लक्ष ठेवावं लागणार आहे.
चेन्नईने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. तर अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. जर चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी ३ सामने जिंकणं गरजेचं असणार आहे. असं झाल्यास चेन्नईचा संघ १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. मात्र हा प्रवास मुळीच सोपा नसणार आहे. कारण चेन्नईला आपले पुढील सामने पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.