Viral video twitter
Sports

Viral Cricket Video: बॉल लागताच जमिनीवर कोसळला, खेळाडूच्या तोंडातून रक्तही आलं; धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

Henry Hunt Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू अनेकदा दुखापतग्रस्त होत असतात. कधी चेंडू लागून तर कधी डाईव्ह मारत असताना, दुखापत होणं हा खेळाचा एक भाग आहे

Ankush Dhavre

Henry Hunt Viral Video:

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू अनेकदा दुखापतग्रस्त होत असतात. कधी चेंडू लागून तर कधी डाईव्ह मारत असताना, दुखापत होणं हा खेळाचा एक भाग आहे. मात्र यावेळी जे घडलंय ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

सामन्यादरम्यान खेळाडूला चेंडू लागला आणि चेंडू लागताच तो जमिनीवर पडला. त्यानंतर त्याच्या तोंडातून रक्तही आलं. ही घटना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श वनडे कप स्पर्धेत घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मार्श वनडे कप स्पर्धेत व्हिक्टोरिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. (Cricket news in marathi)

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरियाचा फलंदाज रॉजर्स ऑफ साईडच्या दिशेने शॉट मारतो. शॉट खेळताच हा चेंडू ३० यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या हेनरी हंटकडे जातो. हा चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न करत असलेल्या हेनरी हंटच्या तोंडाला जाऊन लागतो. चेंडू लागताच त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागतं. या घटनेमुळे सामना काही वेळ थांबवावा लागतो. शेवटी त्याला मैदानाबाहेर घेऊन जावं लागलं.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरियाने साऊथ ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साऊथ ऑस्ट्रेलियाने ५० षटक अखेर ९ गडी बाद २३१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरियाने ४४.१ षटकात २३४ धावा करत सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शुल्लक कारणावरुन वाद

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT