आशिया कप २०२५ सुपर ४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना
मागील सहा वर्षांत पाकिस्तानला श्रीलंकेला धूळ चारता आली नाही
२१८० दिवसांपासून पाकिस्तानचा विजयाचा दुष्काळ
करो वा मरो सामन्यात श्रीलंकेचं पारडं जड
Pakistan vs Sri lanka : फायनलमध्ये पोहचून भारताला पराभूत करण्याचं स्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानसमोर आता श्रीलंकेचं तगडं आव्हान आहे. मागील सहा वर्षांत श्रीलंका संघाविरुद्ध कामगिरी बघितली तर पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार असं क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
२१८० दिवस जे जमलं नाही ते करण्याचं आव्हान आता पाकिस्तानसमोर आहे. यावेळीही पाकिस्ताननं कच खाल्ली तर, श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यातच ते आशिया कपमधून बाहेर होणार हे निश्चित समजले जाते. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेला पराभूत करण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. कारण तब्बल सहा वर्षे पाकिस्तानला हे जमू शकले नाही. २१८० दिवस उलटून गेले आहेत. पण श्रीलंकेला पराभूत करणं पाकिस्तानला जमलं नाही.
पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेचं पारडं जड राहिलं आहे. ५ ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येकवेळी श्रीलंकेनं पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. आता सहाव्यांदा ते भिडणार आहेत. आशिया कपमधील सुपर ४ मध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांसाठी हा सामना करो वा मरो असा आहे. कारण जो पराभूत होईल, त्याला गाशा गुंडाळावा लागणार आहे.
मागील सहा वर्षांत दोन्ही संघ एकमेकांविरोधात पाच सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या निकालावरून तरी पाकिस्तानचा आशिया कपमधील पुढचा प्रवास संपुष्टात येणार असल्याचं निश्चित आहे, असं मानलं जातं.
पाकिस्तानचा यूएईमध्ये ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. तिथं पाकिस्तानचं पारडं श्रीलंकेपेक्षा जड मानलं जातंय. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये सात सामने झाले आहेत. त्यात चार पाकिस्तानने जिंकले, तर तीन सामन्यांत श्रीलंकेनं बाजी मारली आहे. पण श्रीलंकेनं जे तीन सामने जिंकले आहेत, त्यातील दोन सामने तर अलीकडेच झाले होते. तसेच आशिया कपमध्ये आतापर्यंत श्रीलंकेचं पारडं जड राहिलंय. आतापर्यंतच्या एकूण रेकॉर्डसंदर्भात सांगायचं झालं तर, आतापर्यंतच्या १८ सामन्यांमध्ये श्रीलंका १३-५ अशा फरकाने पुढे आहे. त्यामुळं यावेळच्या करो वा मरो सामन्यात श्रीलंकेचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.