ind vs nz  twitter
क्रीडा

टीम इंडियाला घरच्या मैदानावर व्हाईटवॉश केले आहे का? इतिहास काय सांगतो? रोहितच्या नावावर लीजारवाणा विक्रम होणार?

IND vs NZ : वानखेडे मैदानावर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. भारतीय संघावर व्हाईट वॉशची नामुष्की आली आहे.

Namdeo Kumbhar

Has India ever suffered a clean sweep in a home Test series? : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियावर व्हाईट वॉशची नामुष्की ओढावली आहे. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने दोन सामने जिंकत बाजी मारली होतीच. पण अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला व्हाईट वॉश टाळण्याची संधी होती. पण रोहित अॅण्ड ब्रिगेडने वानखेडेवर निराशा केली. दुसऱ्या डावात १४७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था दैयनीय झाली आहे.

भारताने फक्त २९ धावांमध्ये ५ फलंदाज गमावाले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. १२ वर्षानंतर भारताने घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली, पण इतिहासात दुसऱ्यांदाच मायदेशात व्हाईट वॉश होण्याची शक्यता आहे. याआधी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताला घरच्या मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

मागील २४ वर्षांपासून भारतीय संघाचा घरच्या मैदानात व्हाईट वॉश झाला नाही. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला घरच्या मैदानावर एकदाच व्हाईट वॉशचा सामना करावा लागला होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी मालिका गमावली होती. दक्षिण आफ्रिकाने २००० मध्ये टीम इंडियाला भारतामध्ये २-० ने पराभवाचा धक्का दिला होता.

हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकाने भारताला भारातमध्ये दोन कसोटीत २-० ने पराभाचा धक्का दिला होता. वानखेडे स्टेडियमवर आफ्रिकाने ४ विकेटने विजय मिळवला होता. तर बंगळुरुमध्ये डाव आणि ७१ धावांनी भारताला धूळ चारली होती. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नव्हते. सौरव गांगुल, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी भारतामध्ये आपल वर्चस्व अबाधित ठेवले होते. याच वर्चस्वाला आता न्यूझीलंड सुरुंग लावत आहे.

न्यूझीलंडने बंगळुरु आणि पुणे कसोटीत विजय मिळवला. आता वानखेडे स्टेडियमवरही दबदबा निर्माण केलाय. भारतीय संघाचे २९ धावात पाच आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. भारताची सर्व मदार ऋषभ पंत याच्या खांद्यावर आहे. रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना जोडीला घेत पंत व्हाइट वॉशची नामुष्की टाळणार का? सचिन तेंडुलकरनंतर भारतात व्हाईट वॉश मिळणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नोंद होणार का? याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT