harmanpreet kaur twitter
Sports

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Harmanpreet kaur Statement: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur On Team India Defeat: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. यासह पराभवाचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे.

काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

या सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, ' आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही. तर त्यांनी शानदार खेळ केला. आम्हाला संधी मिळाली, मात्र आम्ही त्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करू शकलो नाही. आम्ही क्षेत्ररक्षणात खूप चुका केल्या. आम्हाला यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आम्ही याआधीही १६०-१७० धावांचा पाठलाग केला आहे. यावेळीही आम्हाला आशा होती की, आम्ही करू शकतो.'

तसेच ती पुढे म्हणाली की, ' आमच्या संघातील कुठल्याही एका फलंदाजाला मोठी खेळी करायची होती. मात्र आम्ही विकेट्स गमावल्या. हा ग्रुप जरा कठीणच असणार आहे. आम्हाला चांगली सुरुवात करता आलेली नाहीये. मात्र यापुढे आम्ही चांगलं क्रिकेट खेळू. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला २० षटकअखेर ४ गडी बाद १६० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १९ षटकात १०२ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला हा सामना ५८ धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान भारतीय संघाचा पुढील सामना ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

SCROLL FOR NEXT