Hardik Pandya watch Saam Tv
Sports

Hardik Pandya : 7,00,00,000 रुपयांचे महागडे घड्याळ घालून मैदानात उतरला हार्दिक पंड्या, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Ind vs Pak Match : भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या महागडं मनगटी घड्याळ घालून उतरला. या घड्याळाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हे घड्याळ तब्बल ७ कोटी रुपयांचे आहे असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत-पाकिस्तान हा महामुकाबला सुरु आहे. सामन्यामध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी केली. फलंदाजीमध्ये कुलदीप यादवने ३, तर हार्दिक पंड्याने २ विकेटस् घेतल्या. हार्दिक पंड्याने बाबर आझम आणि सऊद शकीलला बाद केले. पंड्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याने हातात घातलेल्या घड्याळाची सर्वत्र चर्चा होत आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने Richard Mille या कंपनीची राफेल नडाल स्केलेटन डायल एडिशन असलेले महागडे घड्याळ घातले होते. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत भारतीय चलनानुसार तब्बल ७ कोटी रुपये इतकी आहे. याआधीही हार्दिकने हे मनगटी घड्याळ खेळताना घातले होते.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया दुबईला पोहोचली आहे. मागील काही काळापासून हार्दिकशी जास्मिनचे नाव जोडले जात आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आज पंड्याला सपोर्ट करण्यासाठी जास्मिन सामना पाहायला आल्याचे चाहते म्हणत आहेत.

मागच्या वर्षी हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा घटस्फोट झाला होता. २०२० मध्ये त्यांनी लग्न केले होते. घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक आणि जास्मिन एकत्र आल्याच्या चर्चा होत आहे. काही महिन्यांपासून ते डेट करत आहेत असेही लोक म्हणत आहेत. पण याबाबत दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT