Hardik Pandya Reaction Video  x (twitter)
Sports

Hardik Pandya Video : पहिल्या विकेटसाठी रडवलं, पण गिल आऊट होताच कर्णधारानं असं काही केलं ते व्हायरलच झालं, पाहा व्हिडिओ

Hardik Pandya Reaction Video : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना रंगला आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने इन फॉर्म शुबमन गिलला बाद केले. गिलच्या विकेटनंतर हार्दिकने जी रिअ‍ॅक्शन दिली ती व्हायरल होत आहे.

Yash Shirke

MI Vs GT Match Live : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल हा ३८ धावा करुन माघारी परतला आहे. त्याला मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने बाद केले आहे. शुबमन गिल आउट झाल्यानंतर हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. त्याच्या या रिअ‍ॅक्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावह व्हायरल झाले आहेत.

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२५ मधला सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि गुजरात ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी लढणार आहेत.

फलंदाजी करण्यासाठी सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन मैदानामध्ये उतरले. सुरवातीला सावधगिरीने खेळत त्यांनी खेळ पुढे नेला. पावरप्लेपर्यंत त्यांनी एकत्रितपणे ६६ धावा केल्या. पुढे आठव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या बॉलिंगसाठी आला. त्याच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर गिलने जोरदार शॉर्ट मारला पण बॉल नमन धीरच्या जवळ गेला. नमन धीरने पटकन कॅच घेत गिलला मैदानाबाहेर पाठवले. तेव्हा हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

मुंबईची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू

गुजरातची प्लेईंग ११ -

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT