Hardik pandya  twitter
Sports

Hardik- Natasa Divorce: हार्दिक- नताशाचा घटस्फोट! मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार? घेतला मोठा निर्णय

Hardik Pandya- Natasa Stankovik: हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान दोघांनी मुलाबाबत मोठा निर्णय घेतला होता.

Ankush Dhavre

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकने मोठा निर्णय घेतला आहे. ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचं ठरवलंय. हार्दिक पंड्याने पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याची केवळ चर्चा होती. मात्र दोघांकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर हार्दिकने चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान त्यांचा मुलगा कोणाकडे राहणार? जाणून घ्या.

पोस्ट शेअर करत दिली माहिती

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हार्दिक पंड्याने हजेरी लावली होती. त्यावेळी तो एकटाच वावरताना दिसला. यापूर्वी झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला. त्यावेळीही नताशा कुठंय? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. बुधवारी ती आपल्या आई वडिलांच्या घरी परतली. त्यानंतर गुरुवारी हार्दिकने घटस्फोट घेतल्याची बातमी दिली.

हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ' ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नातं टिकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र आम्हाला आता हाच निर्णय घेणं योग्य वाटतंय. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं.'

मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार?

दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अगत्य कोणाकडे राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ' अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक भाग असेल. आम्ही दोघे त्याचं पालकत्व सांभाळणार आहोत. यासह आम्ही त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्ही अशी आशा करतो की, आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही आम्हाला समजून घ्याल.' हार्दिक पंड्या आणि नताशाने २०२० मध्ये लग्न केलं होतं त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. त्यानंतर अगत्य झाल्यानंतर ते पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT