ishan kishan twitter
Sports

Hardik Pandya: 'आमचा छोटा पॅकेट,आम्हाला हवा होता.. ईशानबाबत बोलताना हार्दिक भावूक

Hardik Pandya on Ishan Kishan: ईशान किशन बाबत बोलताना हार्दिक पंड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावापुर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. गेली काही वर्ष संघाचा प्रमुख भाग असलेल्या ईशान किशनला मुंबईने रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो लिलावात आला.

लिलावात त्याला मुंबईने खरेदी करण्यासाठी जोर लावला. मात्र हवा तितका जोर लावला नाही. शेवटी सनरायझर्स हैदराबादने त्याला ११.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

ईशान किशनला रिलीज केल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने भावूक होऊन ईशान किशनला फेअरवेल दिला आहे.

हार्दिकचा ईशान किशनला हटके स्टाईल फेअरवेल

ईशान किशनला फेअरवेल देण्यासाठी मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. त्याला फेअरवेल देताना हार्दिक पंड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ईशान आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो.

आता तो संघात नसताना त्याची कमतरता जाणवणार असल्याचं हार्दिक पंड्याने सांगितलं. ईशान मुंबई इंडियन्सचा पॉकेट डायनॅमो होता. असं हार्दिक पंड्याने म्हटलं आहे.

तसेच ईशान किशनला संघात घेण्याबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, ' जेव्हा आम्ही त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आम्हाला माहीत होतं की, आम्ही त्याला लिलावात पुन्हा घेऊ शकणार नाही. कारण तो कसा खेळाडू आहे हे आम्हाला माहीत आहे.'

ईशान किशनला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने जोर लावला. मात्र मुंबईचा संघ त्याला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकला नाही. शेवटी सनरायझर्स हैदराबादने ११.२५ कोटी मोजत त्याला आपल्या संघात स्थान दिलं. आगामी हंगामात तो हैदराबादकडून खेळताना दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT