harbhajan singh  yandex
Sports

Team India Playing XI: दुसऱ्या कसोटीसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग ११; सरफराजचं पदार्पण तर प्रमुख गोलंदाजाला ठेवलं संघाबाहेर

Harbhajan Singh Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी हरभजन सिंगने प्लेइंग ११ निवडली आहे.

Ankush Dhavre

Harbhajan Singh Playing XI Prediction:

हैदराबादच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यातील सुरुवातीच्या ३ दिवस भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. त्यानंतर ओली पोपने मोठी खेळी करत हा सामना भारतीय संघापासून दूर नेला.

अखेर हा सामना भारतीय संघाला २८ धावांनी गमवावा लागला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

हरभजन सिंगचं स्पष्ट म्हणणं आहे की, केएल राहुलच्या अनुपस्थितीत सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी मिळायलाच हवी. तर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रविंद्र जडेजाच्या जागी, वॉशिंग्टन सुंदरला तर मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात यावी असं हरभजन सिंगचं म्हणणं आहे.

संघातील प्रमुख खेळाडू बाहेर..

भारतीय संघाला या मालिकेत एकापेक्षा एक मोठे धक्के बसले आहेत. मालिका सुरु होण्यापूर्वीच संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला. तर विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या २ सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. संघातील प्रमुखे अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. तर केएल राहुल देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. (Cricket news in marathi)

विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं होतं. तर रविंद्र जडेजा आणि केएल राहुलच्या जागी, सरफराज खान,वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारला संघात स्थान दिलं आहे. दुसऱ्या कसोटीत युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे हरभजन सिंगने निवडलेली प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल,आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT