Hanuma Vihari's amazing innings in Ranji Trophy Quarter Final 2023
Hanuma Vihari's amazing innings in Ranji Trophy Quarter Final 2023 Twitter
क्रीडा | IPL

Hanuma Vihari : फ्रॅक्चर हात घेऊन मैदानात उतरला हनुमा विहारी, एका हाताने ठोकले दोन चौकार

Chandrakant Jagtap

Hanuma Vihari News : टीम संकटात असताना मैदानावर फ्रॅक्चर हात घेऊन मैदानात उतरलेल्या हनुमा विहारीच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे. रणजी करंडकच्या उपांत्यपूर्व फेरीत फलंदाज हनुमा विहारीने केलेल्या कामगिरीमुळे त्याची प्रशंसा होत आहे. आंध्रचा कर्णधार असलेल्या हनुमा विहारीने उजव्या हाताला फ्रॅक्चर असूनही जिद्दीने फलंदाजी केली.

हात तुटलेला असूनही हनुमा विहारी क्रीजवर आला आणि एका हाताने जोरदार फटके खेळत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुखापतग्रस्त असतानाही विहारीने पहिल्या डावात 57 चेंडूत 27 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात एका हाताने खेळत 16 चेंडूत 15 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकारही मारले. (Cricket News)

गुरुवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विहारी आपल्या संघाला वाचवण्यासाठी हाताला प्लास्टर असूनही फलंदाजीसाठी मैदानात उतरला. हे पाहून मैदानावरील दोन्ही संघांच्या खेळाडूंना धक्काच बसला. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रात सर्व 10 बळी घेत सामन्यात पुनरागमन केले. आंध्रच्या 11 फलंदाजांपैकी फक्त चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. आश्चर्याची बाब म्हणजे हनुमा विहारी त्यापैकी एक होता.

एका हाताने ठोकले सलग दोन चौकार

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीने पुन्हा एकदा डाव्या हाताने फलंदाजी केली. फिरकीपटू सरांश जैनविरुद्ध त्याने सलग दोन चौकार मारले. यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. हात फ्रॅक्चर असूनही हनुमाला खेळाताना पाहून संपूर्ण आंध्र संघ खूश झाला. हनुमा विहारीच्या या स्पोर्ट्स स्पीरिटचं सोशल मीडियावर लोक प्रचंड कौतुक करत आहेत.

मध्य प्रदेशची सामन्यावर मजबूत पकड

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मध्य प्रदेशने मजबूत पकड मिळवली आहे. आता विजयासाठी मध्य प्रदेशला चौथ्या आणि शेवटच्या दिवशी 187 धावांची गरज आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात बिनबाद 58 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी पहिल्या डावात आंध्रने 379 धावा आणि मध्य प्रदेशने 228 धावा केल्या होत्या. आंध्रचा संघ दुसऱ्या डावात 93 धावांत गारद झाला. आंध्रला पहिल्या डावात 151 धावांची आघाडी मिळाली होती. मध्य प्रदेशसमोर आता विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT