Shubman Gill Vs Virat Kohli : शुभमन गिलची विराट कोहलीशी का होतेय तुलना?; दिग्गज क्रिकेटपटू सारं काही बोलून गेला!

Shubman Gill Vs Virat Kohli Latest Cricket Update : दिग्गज क्रिकेटपटूनं शुभमन गिलची तुलना विराट कोहलीशी केली आहे.
Shubman Gill Vs Virat Kohli
Shubman Gill Vs Virat Kohli SAAM TV

Shubman Gill Vs Virat Kohli Latest News : सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानावर धावांचा रतीब घालणाऱ्या टीम इंडियाच्या शुभमन गिलची जोरदार 'हवा' आहे. सर्वच जण त्याच्या बहारदार खेळीच्या प्रेमात पडलेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणलाही राहावलं नाही. त्यानंही कौतुकाचा वर्षाव सुरू केला आणि त्याची तुलना थेट दिग्गज फलंदाज विराट कोहलीशी केलीय.

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलबाबत (Shubman Gill) माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गिलकडेही तेवढंच टॅलेंट आहे, जितकं विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे, असं पठाण म्हणाला. शुभमन गिलने आपल्याकडील गुणवत्तेप्रमाणे कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे, असंही तो म्हणाला.

Shubman Gill Vs Virat Kohli
Ind vs NZ T20: शतकवीर गिलचे ७ मोठे रेकॉर्ड! विराटलाही धोबीपछाड

भारतीय संघानं अहमदाबादेत झालेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडला १६८ धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल यानं स्फोटक खेळी करत शतक झळकावलं. त्याच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर २३५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

Shubman Gill Vs Virat Kohli
Shubhman Gill: ऐकलं का! १०० रुपयांची पैज अन् टीम इंडियाला सापडला अनमोल हिरा; शुभमन गिलने सांगितला किस्सा

हे आव्हान घेऊन मैदानात आलेला न्यूझीलंडचा संघ अवघ्या ६६ धावांवर गारद झाला. शुभमन गिलनं अवघ्या ६३ चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं नाबाद १२६ धावांची धुवाधार खेळी केली. या सामन्यात भारतीय संघानं (Team India) टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. याआधी भारतीय संघानं आयर्लंडच्या विरुद्ध २०१८ मध्ये १४३ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, टीम इंडियानं ही मालिका २-१ अशा फरकानं जिंकली.

काय म्हणाला इरफान पठाण?

इरफान पठाण यानं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शुभमन गिलची तुलना विराट कोहलीशी केली. ज्या प्रकारे शुभमन गिल फलंदाजी करत आहे, ते पाहून मी त्याचा चाहता झालोय. तो तिन्ही फॉरमॅटमधला खेळाडू आहे, हे मी वारंवार सांगत आहे. विराट कोहली बरीच वर्षे तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकला. शुभमनकडेही तीच क्षमता आहे. फक्त ती कामगिरीत बदलणे वेगळी गोष्ट आहे, असं इरफान म्हणाला.

दुसरीकडे आकाश चोप्रानेही गिलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटलंच होतं की शुभमन गिल हा कसोटी क्रिकेट उत्तम खेळतो. वनडे तर त्याचा आवडता फॉरमॅट आहे. पण टी २० क्रिकेटच्या बाबतीत मला पूर्ण खात्री नव्हती. आता गिलने इतकी मोठी खेळी केलीय की मी माझे शब्द मागे घेतो, असं आकाश चोप्रा म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com