Gujarat gives 178 runs target to Rajasthan saam tv
Sports

GT vs RR: शुभमन गिल, डेव्हिड मिलरची जबरदस्त फटकेबाजी, गुजरातचं राजस्थानसमोर 178 धावांचं लक्ष्य

IPL 2023, GT vs RR: गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 177 धावा केल्या. आता राजस्थानसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य आहे.

Chandrakant Jagtap

Gujarat Titans vs Rajasthan Royals: आयपीएलच्या 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले आहेत. या दोघांमधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 177 धावा केल्या. आता राजस्थानसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 46 आणि शुभमन गिलने 45 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 28, अभिनव मनोहरने 27 आणि साई सुदर्शनने 20 धावांचे योगदान दिले.

ऋद्धिमान साहा चार आणि रशीद खानने एक धाव काढून बाद झाला. राजस्थानकडून संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात केवळ 25 धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. याशिवाय ट्रेंट बोल्ट, अॅडम झाम्पा आणि युझवेंद्र चहल यांना देखील प्रत्येकी एक विकेट मिळाली.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :

वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT