GT vs RCB live updates royal challengers bangalore need 201 runs to win amd2000 twitter
Sports

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

GT vs RCB, Live Updates: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४५ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४५ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात साई सुदर्शनने शानदार खेळी करत गुजरात टायटन्स संघाची धावसंख्या ३ गडी बाद २०० पर्यंत पोहचवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावांची गरज आहे.

गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. तर शाहरुख खानने ५४ धावा चोपल्या.सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शुभमन गिलला १६ तर रिद्धीमान साहाला अवघ्या ५ धावा करत आल्या. यासह या संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २०० धावा करत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल,स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल ,कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर),

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैशाख

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर,शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया,

इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वॉरियर, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT