GT vs MI Playing-11 SAAM TV
क्रीडा

GT vs MI Playing-11: क्वालिफायरसाठी रोहितचा मेगा प्लान! ही असेल मुंबईची परफेक्ट इलेव्हन

IPL 2023 GT vs MI qualifier 2 : आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत तीनदा आमनेसामने आले आहेत. गुजरातने एकदा तर मुंबईने दोनदा विजय मिळवला. अशा स्थितीत रोहितच्या पलटणचा वरचष्मा आहे.

Chandrakant Jagtap

GT vs MI qualifier 2 : पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. क्वालिफायर-1 मध्ये गुजरातला चेन्नई सुपर किंग्जकडून 15 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी मुंबईने एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. या विजयामुळे मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडणार आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत तीनदा आमनेसामने आले आहेत. गुजरातने एकदा तर मुंबईने दोनदा विजय मिळवला. अशा स्थितीत रोहितच्या पलटणचा वरचष्मा आहे.

सूर्या-रोहितसमोर रशीदचे आव्हान

आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार गुजरातचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानशी टक्कर देताना दिसतील. रशीदने रोहितला 6 डावात 4 वेळा बाद केले आहे. त्यामुळे रोहितला आज राशिदसमोर सावधगिरीने खेळावे लागले. दुसरीकडे सूर्यकुमारने राशीदसमोर 47 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात सुर्यकुमार चांगली खेळी करू शकला तर मुंबईला मोठी धावसंख्या भारता येऊ शकते किंवा चेस करण्यास मदत होऊ शकते.

आकाश, नेहल नवे स्टार

या आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही पण तिलक वर्मा, नेहल वढेरा आणि आता आकाश मधवाल या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. एलिमिनेटरमध्ये लखनऊविरुद्ध मधवालची 5 विकेटची खेळी करिष्माई होती, पण त्याआधी हैदराबादविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात त्याच्या 3 बळींनी मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. वढेराने आरसीबीविरुद्ध ५२ आणि चेन्नईविरुद्ध ६४ धावांची शानदार खेळी खेळली. एलिमिनेटरमध्येही त्याने लखनौविरुद्ध महत्त्वपूर्ण 23 धावा केल्या. पियुष चावलाने या मोसमात 21 विकेट्स घेऊन आपली भूमिका चांगली कामगिरी केली आहे.

किशन ग्रीन, डेव्हिडची भूमिका महत्त्वाची

इशान किशनने आतापर्यंत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तर कॅमेरून ग्रीन आणि टिम डेव्हिड यांनी देखील त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत. हैदराबादविरुद्ध शतक झळकावून ग्रीनही योग्य वेळी फॉर्ममध्ये आला आहे. लखनऊविरुद्धही त्याने महत्त्वपूर्ण 41 धावांची खेळी केली होती. शिवाय टीम डेव्हिडच्या चांगली फिनिश करू शकतो. (Latest Sports News)

ही असू शकते मुंबई इंडियन्सची परफेक्ट प्लेइंग इलेव्हन:

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

गरज भासल्यास संघ लक्ष्याचा बचाव करताना सूर्यकुमारच्या जागी अतिरिक्त फिरकीपटू आणू शकतो. अशा स्थितीत कुमार कार्तिकेयला खेळण्याची संधी मिळू शकते. लक्ष्याचा पाठलाग करताना संघ सुरुवातीच्या प्लेइंग-11 मध्ये कार्तिकेयचा समावेश करू शकतो. नंतर नेहल वढेरा किंवा सूर्यकुमार यांना इम्पॅख्ट सब्स म्हणून आणले जाऊ शकते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT